26 C
Mumbai
Sunday, August 7, 2022
घरराष्ट्रीयसोनिया गांधीच्या चौकशीवर 'यशवंत सिन्हां'नी केली टीका

सोनिया गांधीच्या चौकशीवर ‘यशवंत सिन्हां’नी केली टीका

टीम लय भारी

मुंबईः काॅंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना आज ‘नॅशनल हेराॅल्ड’ प्रकरणी ‘ईडी’ने चौकशीला बोलावले होते. या आंदोलनाविरोधात दिल्ली मुंबईसह देशभरात काॅंग्रेसने आंदोलन करुन निषेध व्यक्त केला. युपीएचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी या प्रकरणावर टीका केली आहे. ईडी नेत्यांना अपमानीत करत असल्याचे त्यांनी व्टिटरवर म्हटले आहे.

ते म्हणाले, मी माहितीसाठी सांगतो की, 1995 मध्ये हवाला प्रकरणी सीबीआयने घरी जावून चौकशी केली होती आणि आता ईडी राजकीय नेत्यांना अपमानीत करत आहेत. लोकसभेमध्ये देखील काॅंग्रेसच्या नेत्यांनी गदारोळ केला. त्यामुळे आज कामकाज काही तासांसाठी तहकूब करण्यात आले होते. चौकशी काॅंगेसच्या अध्यक्षा सोनिया गांधीची तब्बेत खराब आहे. त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोना झाला होता. तरी देखील ईडी त्यांना चौकशीसाठी कार्यालयात बोलवत आहे.

सोनिया गांधीची तीन चरणांमध्ये झाली. ईडीचे अतिरिक्त महानिदेशक मोनिका शर्मा यांच्या नेतृत्वात ही तपासणी सुरु आहे. या प्रकरणी कागदपत्रांची तपासणी केली. देशभरात सोनिया गांधीच्या चौकशी  विरोधात काॅंग्रेसने आंदोलने केली. महाराष्ट्रात भाई जगताप, नाना पटोले यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रणीती शिंदे, पृथ्वीराज चैहान यांनी आंदोलनात सहभाग घेतला. नाशिकमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात आंदोलने झाले. नागपूरात देखील आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला.

हे सुध्दा वाचा:

VIDEO : ईडीच्या चैकशी विरोधात काँग्रेसचे आंदोलन पेटले

मोलमजुरी करुन ‘महापौर‘ झालेल्या तरुणाची घेतली राहूल गांधीनी दखल

‘मी इंदिरा गांधीची सून आहे, घाबरणार नाही‘ – सोनिया गांधी

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!