30 C
Mumbai
Wednesday, August 30, 2023
घरराष्ट्रीययोगी आदित्यनाथ यांना रक्षाबंधनानिमित्त मुलींनी बांधली राखी

योगी आदित्यनाथ यांना रक्षाबंधनानिमित्त मुलींनी बांधली राखी

नेत्वा धुरी, मुंबई: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लहान मुलींकडून बुधवारी राखी बांधून घेतली. लखनऊ येथील सुमंगला योजना कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हजेरी लावली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंत्री कन्या सुमंगल योजनेअंतर्गत 29 हजार 523 मुलींना पाच कोटी 82 लाखाची आर्थिक मदत दिली. निराश्रीत महिला पेन्शन योजनेअंतर्गत पाच लाख लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये 150 कोटींची आर्थिक मदत दिली.

भारतीय समाजात मातृभावनेला फार महत्त्व आहे. मातृत्वाचे गुणगौरव काढणारे कार्य समाजातील प्रत्येक स्तरातून व्हायला हवे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘बेटी बचाव बेटी पढाव’ ही संकल्पना उंचीवर पोहोचायला हवी.

मुलगी ही मुलगी असते, तिच्यासोबत कोणत्याही स्तरावर भेदभाव नसावा. असेही ते म्हणाले. यावेळी बॉर्ड परीक्षात उत्तीर्ण झालेल्या मुलींना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मुलींचे यश पाहून योगी आदित्यनाथ गहिवरले. आमच्या मुली प्रगती करत आहेत, त्यांच्या आत्मविश्वास झळकू लागला आहे. सरकारने मुलींसाठी लागू केलेल्या योजना यशस्वी झाल्याचे हे प्रतीक आहे, मुख्यमंत्र्यांनी आपला आनंद व्यक्त केला.

हे ही वाचा 

पंतप्रधान नरेंद्र मोदींना शाळकरी मुलींनी बांधली राखी

खासदार श्रीकांत शिंदेंच्या सौभाग्यवतीने धरला मंगळागौरचा फेर !

धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांची रक्षाबंधन ठरणार आगळी -वेगळी!

माता-भगिनींच्या सेवांसाठी, त्यांना स्वावलंबी करण्यासाठी डबल इंजिन सरकार सदैव तयार आहे, अशी प्रतिक्रिया उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजमाध्यमांवर दिली. सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी