30 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeटॉप न्यूजNavi Mumbai : रिक्षाला वाचवताना फॉर्च्युनर दुभाजकावर आदळली, 4 वेळा उलटली, एक...

Navi Mumbai : रिक्षाला वाचवताना फॉर्च्युनर दुभाजकावर आदळली, 4 वेळा उलटली, एक ठार!

टीम लय भारी

नवी मुंबई : रिक्षा सिग्नल तोडून जात असताना त्याच मार्गावरुन भरधाव फॉर्च्युनर कार चालली होती. यावेळी रिक्षाला वाचवण्याच्या प्रयत्नात कार डाव्या बाजूला दुभाजकाला ठोकून 3 ते 4 वेळा उलटली आणि शंभर मीटर अंतरावर जाऊन आदळली(Navi Mumbai: One killed in rickshaw accident)

यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. नवी मुंबईत रविवारी हा अपघात झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवस काशी दौऱ्यावर, काशी विश्वनाथ कॉरीडॉरचं लोकार्पण, वाचा संपूर्ण दौरा

मलिकांचे कौतुक करणारे उध्दव ठाकरे आव्हाड आणि टोपेंबाबत पक्षपात करत आहेत काय?; भाजपाचा सवाल

नेमकं काय घडलं?

नवी मुंबईतील पामबीच मार्ग अक्षर सिग्नलवर बेलापूरकडून सीवूड्सच्या दिशेने जाणारी रिक्षा सिग्नल तोडून जात होती. तेवढ्याच कालावधीमध्ये अतिशय वेगाने फॉर्च्युनर कार वाशीकडून बेलापूरच्या दिशेने चालली होती. यावेळी रिक्षाला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना फॉर्च्युनर डाव्या बाजूला डिव्हायडरवर आपटली.

एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

गाडी तीन ते चार वेळा पलटी मारुन पुढे बरोबर शंभर मीटर अंतरावर जाऊन आदळली. या अपघातात फॉर्च्युनरमध्ये असलेले पाच जण आणि रिक्षामध्ये असलेले दोघे प्रवासी जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी दाखल झाले असून पुढचा तपास एनआरआय पोलीस करत आहेत.

Raj Thackeray : राज ठाकरे ॲक्शन मोडमध्ये, आज नाशिक दौऱ्यादरम्यान साधणार कार्यकर्त्यांशी संवाद

Navi Mumbai: 7 injured in road accident near Palm Beach Road

वाहनचालकांवर निर्बंध नाही

पामबीच मार्गावर स्पोर्ट्स बाईक आणि कार अतिशय वेगाने चालवले जातात आणि वेळोवेळी वाहतूक पोलिसांकडून कारवाईही केली जाते, मात्र वाहन चालकांवर कुठलाही परिणाम होत नसल्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत. पोलीस आणि पालिका प्रशासन यावर काही उपयोजना करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी