28.9 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमुंबईराणा दांपत्याचा नाहक हट्ट, शिवसैनिक धडा शिकविण्याच्या तयारीत!

राणा दांपत्याचा नाहक हट्ट, शिवसैनिक धडा शिकविण्याच्या तयारीत!

टीम लय भारी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav thackeray) यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर २३ एप्रिल रोजी हनुमान चालिसा पठणाचा निर्धार खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा (Navneet rana and Ravi rana) यांनी केला आहे. पण ते आजच मुंबईत दाखल झाले. मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला १४९ ची नोटीस बजावली असली तरी आता उद्या ते मातोश्रीवर जाण्यावर ठाम आहेत. आम्ही मातोश्रीवर शांततेत हनुमान चालिसा पठण करण्यासाठी आलो आहोत असे त्यांनी सांगितले आहे. (Navneet rana and ravi Rana arrives in Mumbai, crowd of Shiv Sainiks outside Matoshri)

 

View this post on Instagram

 

A post shared by Navneet Kaur Rana (@navneetravirana)

दरम्यान, राणा दाम्पत्य (Navneet rana and Ravi rana) मुंबईत आल्यानंतर मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची गर्दी केली आहे. त्यामुळे वातावरण अधिक तणावग्रस्त बनलं आहे. मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी मातोश्रीकडे वाईट आणि वाकड्या नजरेने बघू नका अन्यथा परिणाम बघा अशा शब्दात इशारा दिला आहे. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर मातोश्री बाहेर पोलिसांनी अधिक बंदोबस्त वाढवला आहे. बॅरिकेटींग करण्यात आली आहे. तसेच मातोश्री बाहेरील एक रस्ता संपूर्णपणे बंद करत येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी करत सोडले जात आहे.

राणा दांपत्यांना ‘बंटी आणि बबली’ म्हणत संजय राऊतांची जोरदार टिका

पक्षाला बदनाम करण्यासाठी आणि महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपने राणांसोबत षडयंत्र रचल्याचा आरोप सेना नेत्यांनी केला आहे. “जर त्यांना हनुमान चालिसाचे पठण करायचे असेल तर त्यांनी ते त्यांच्या घरीच करावे. पण जर त्यांनी स्टंट करायचे ठरवले तर आम्ही त्यांना चोख प्रत्युत्तर देऊ. शिवसेनेला बदनाम करण्यासाठी आणि महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून जाणीवपूर्वक (Navneet rana and Ravi rana) असे प्रयत्न केले जात आहेत,’ असे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मातोश्रीबाहेर माध्यमांशी बोलताना सांगितले.

मशिदीवरील भोंगे हटवण्याच्या मुद्यावरून राजकारण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj thackeray) यांनी २ एप्रिल रोजी राज्य सरकारला ३ मे पर्यंत मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याचे (Navneet rana and Ravi rana)  आदेश दिल्यानंतर आणि तसे न झाल्यास मशिदीबाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्याची धमकी दिल्याने हनुमान चालिसाच्या पठणाचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात तापला आहे

हे सुद्धा वाचा :- 

MLA Ravi Rana, wife MP Navneet decide to recite Hanuman Chalisa in front of Matoshri, served notice

महाविकास आघाडीमुळेच विजेचा खेळखंडोबा सुरु आहे : प्रवीण दरेकर

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी