30 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीयराणा दांपत्याला न्यायालयाकडून दिलासा नाही. जामीन अर्जावरील सुनावणी २९ एप्रिलला, तोपर्यंत तुरूंगातच...

राणा दांपत्याला न्यायालयाकडून दिलासा नाही. जामीन अर्जावरील सुनावणी २९ एप्रिलला, तोपर्यंत तुरूंगातच मुक्काम

टीम लय भारी 

मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवि राणा यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा अट्टाहास केला. त्यानंतर मातोश्रीवर येण्यासाठी ते मुंबईत दाखल झाले. त्यामुळे शिवसैनिक आणि राणा दाम्पत्य यांच्यात जोरदार धुमश्चक्री झाली. हाच हट्ट या राणा दांपत्याच्या चांगलाच अंगलट आलाय. शनिवारी राणा पती – पत्नीची तुरूंगात रवाणगी सुद्धा झाली असून न्यायालयाने याचिका फेटाळली आहे. त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी २९ एप्रिलला आहे.  (Navneet Rana and Ravi Rana is not relieved by the court)

खार पोलिसांनी दाखल केलेले राणा दांपत्यावरील दोन गुन्हे रद्द करण्याची मागणी न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांच्या खंडपीठाने फेटाळलंय. तुमच्या म्हणण्यानुसार, धार्मिक श्लोक, हनुमान चालिसा घराबाहेर वाचण्यास कायद्यानुसार परवानगी आहे, याचा अर्थ असा होत नाही की, मुख्यमंत्र्याच्या बंगल्यासमोर किंवा रस्त्यावर हनुमान चालिसा पठण करणे, असे न्यायमूर्तींनी राणा दांपत्याला ठणकावत याचिका फेटाळली आहे.

नवनीत राणा यांची तुरुंगात दयनीय अवस्था

नवनीत राणा सध्या तुरूंगात आहेत. तिथे त्यांची फारच दयनीय स्थिती आहे. अभिनेत्री, आमदाराची पत्नी आणि नंतर खासदार असे ऐय्याशीचे जिवन जगणाऱ्या राणांना तुरूंगातील कैद्यांसोबत राहावे लागतंय. (Navneet Rana and Ravi Rana is not relieved by the court)


 हे सुद्धा वाचा :

राणा दांपत्याचा नाहक हट्ट, शिवसैनिक धडा शिकविण्याच्या तयारीत!

नवनीत राणा मागासवर्गीय आहेत का, छगन भुजबळांचा बोचरा सवाल

भाजपाला मार्केटिंगसाठी अशा लोकांची गरज, राणा दांपत्यांना ‘बंटी आणि बबली’ म्हणत संजय राऊतांची जोरदार टिका

लवकरच किराणा दुकानात वाईन मिळणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार निर्णय

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी