मुंबईराजकीय

खासदार नवनीत राणा यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान

आमदार रवी राणा आणि खासदार नवणीत राणा (Navneet Rana) हे दिल्लीला रवाना झाले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नवनीत राणांनी  ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री तुम्ही महाराष्ट्रातील कुठलाही मतदारसंघ निवडा, मी तुमच्या विरोधात उभी राहणार आहे. तुम्ही जनतेतून निवडून येऊन दाखवा, असं आव्हान नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे.

टीम लय भारी

खासदार नवनीत राणा यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान

मुंबई: आमदार रवी राणा आणि खासदार नवणीत राणा (Navneet Rana) हे दिल्लीला रवाना झाले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नवनीत राणांनी  ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री तुम्ही महाराष्ट्रातील कुठलाही मतदारसंघ निवडा, मी तुमच्या विरोधात उभी राहणार आहे. तुम्ही जनतेतून निवडून येऊन दाखवा, असं आव्हान नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे.

हनुमान चालीसा पठण करणं आणि श्रीरामाचं नाव घेणं हा जर गुन्हा असेल तर १४ दिवस नाही तर १४ वर्ष तुरुगांत राहण्यास तयार असल्याचं नवनीत राणा (Navneet Rana) यांनी म्हटलं आहे. मी माझी लढाई पुढं सुरु ठेवणार आहे, असं राणा म्हणाल्या आहेत. माझ्यावरील कारवाई ज्या प्रकारे करण्यात आली ती जनतेनं पाहिली आहे. अजित दादा तुम्ही चांगलं काम करता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काम करत नाहीत. आमच्यावर लॉकअपपासून ते तुरुंगापर्यंत काय अन्याय झाला? याची माहिती घ्या. तुम्ही रोखठोक बोलणारे आहात. तुम्ही न्याय द्याल ही अपेक्षा आहे, असं नवनीत राणा म्हणाल्या आहेत.

हे सुद्धा वाचा: 

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे खरे मारेकरी भाजपा व फडणवीस सरकारच !: नाना पटोले

Hanuman Chalisa Row: Mumbai Police Moves Sessions Court for ‘Cancelling Bail’ of Ranas; BMC Inspects Residence for ‘Irregularities’

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close