32 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रनवाब मलिकांनी राज्यपाल कोश्यारींना टोला लगावला

नवाब मलिकांनी राज्यपाल कोश्यारींना टोला लगावला

टीम लय भारी

मुंबई :- महाविकास आघाडीचे विधानसभा अध्यक्षपद कोणाकडे असणार हे सुनिश्चित झाले नाही. यासाठी लवकरच निवडणूका होणार आहे. यासाठी तिन्ही पक्षात एकमत आहे. काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलतांना भगतसिंह कोश्यारी यांनाही टोला लगावला आहे (Nawab Malik attacked Governor Koshyari).

आमदारांचे कोरोना रिपोर्ट आल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निर्णय होईल. आज माध्यमांशी बोलतांना काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक म्हणाले आम्ही विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक बहुमत सिद्ध करताना जी संख्या होती त्यापेक्षा जास्त मताने जिंकू, असा दावा करत त्यांनी भगतसिंह कोश्यारी यांनाही टोला लगावला आहे (Claiming this, he has also targeted Bhagat Singh Koshyari).

मराठी माणसांना अभिजात मराठीची माहिती असणं गरजेची : सुभाष देसाई

आघाडी सरकारचे अपयश झाकण्यासाठी भुजबळ, वडेट्टीवारांचा खोटारडेपणा – राम शिंदे

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले होते. त्यावेळी त्यांनी दिलेल्या निवेदनातील तिनही विषय महत्वाचे असल्याचे एक पत्र राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे त्यावरुन मलिक यांनी राज्यपालांना टोला लगावला आहे (In a letter written by the Governor to the Chief Minister, Malik has slammed the Governor).

नवाब मलिक यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे यात ते म्हणाले, नाना पटोले यांच्या राजिनाम्यानंतर रिक्त असलेले विधानसभा अध्यक्षपद भरून काढण्यासाठी या पावसाळी अधिवेशनात आमदारांचे कोरोना रिपोर्ट आल्यानंतर सरकारमधील तीनही पक्ष निवडणुकीचा निर्णय घेतील. आमच्याकडे असलेल्या बहुमताच्या आकड्यापेक्षा जास्त मतांनी अध्यक्ष निवडून येईल. असे वक्तव्य त्यांनी आपल्या ट्विट मध्ये केले आहे.

अजित पवार, अनिल परब यांच्यावरही सीबीआयची कुऱ्हाड, भाजपने कंबर कसली

We Are Trying To Unite Like-Minded Parties: NCP Leader Nawab Malik On Opposition Meet

यानंतर नवाब मलिक म्हणाले, निश्चितरुपाने महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेणे आवश्यक आहे. त्याबाबत तिन्ही पक्षात एकमत आहे. दोन दिवसाचे अधिवेशन असले तरी याच अधिवेशनात कार्यक्रम करता येईल यावर विचारविनिमय सुरु असल्याचे मलिकांनी सांगितले आहे

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा उपाध्यक्षांना अध्यक्षपदाची निवडणूक लवकर करा असे सूचित केले आहे. मात्र विधानपरिषदेच्या 12 जागा रिक्त आहेत. तो विषयही प्रलंबित आहे. तो निकाली काढलात तर 12 आमदार महाराष्ट्रातील जनतेच्या विकासासाठी कामाला लागतील, असे सांगतानाच असा आमचा आग्रह वारंवार राहिला आहे. याची आठवणही मलिक यांनी राज्यपाल यांना आज पुन्हा एकदा करुन दिली. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेऊच. पण त्याअगोदर 12 आमदार नियुक्तीचे प्रकरण लवकर निकाली काढा, असा विनंतीवजा आग्रह मलिक यांनी राज्यपालांना केलाय.

मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात काय लिहिले होते राज्यपालांनी

राज्यपाल भगत सिंह कोश्यारींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात राज्यपाल म्हणतात, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे शिष्टमंडळ 23 जून रोजी मला भेटले. त्यांनी दोन निवेदने मला दिली आहेत. त्यामध्ये त्यांनी विधानसभा अधिवेशनाचा कालावधी वाढवणे, विधानसभा अध्यक्षांची निवड आणि ओबीसी आरक्षण प्रलंबित असल्याने जिल्हा परिषद निवडणुका स्थगित करा, या मागण्या केल्या आहेत. हे तीनही विषय महत्त्वाचे आहेत. त्यावर योग्य कारवाई करुन, याबाबत मला कळवा” असे राज्यपालांनी म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी