28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रनवाब मलिक यांचा मुक्काम आर्थर रोड कारागृहातच : सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

नवाब मलिक यांचा मुक्काम आर्थर रोड कारागृहातच : सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

टीम लय भारी 

मुंबई : प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट अंतर्गत ईडीने केलेल्या अटकेला आव्हान देणारी याचिका अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दाखल केली होती. ही विशेष याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज 22 एप्रिल शुक्रवारी फेटाळून लावली. अटकेपासून संरक्षण देण्यास सर्वोच्च न्यायालयाने आता नकार दिला आहे त्यामुळे नवाब मलिक यांना दिलासा नसून त्यांचा मुक्काम आर्थर रोड कारागृहात आहे.  (Nawab Malik stays in Arthur Road Jail)

न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि सूर्यकांत यांच्या खंडपीठाने मलिकची याचिका फेटाळून लावली, जी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध दाखल करण्यात आली होती. नवाब मलिक यांचे वकील कपिल सिब्बल यांनी आपली बाजू सर्वोच्च न्यायालयाकडे मांडली त्यावेळी न्यायालयाला असं सांगितलं की, १९९९ साली बाँबस्फोट झाले त्यामध्ये दाऊदची फॅमिली दोषी होती त्यानंतर २०२२ मध्ये ही कारवाई का केली जात आहे. मात्र कोर्टाने याबाबत हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. तुम्ही दुसऱ्या कोर्टाकडे दाद मागू शकता असा मोठा झटका आता सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना दिला आहे.

संपूर्ण राष्ट्रवादीच लक्ष आज नवाब मलिक यांच्याबाबत होणाऱ्या सुनावणीकडे होतं. 23 मार्चपासून नवाब मलिक कोर्टात आहेत. मात्र आजच्या न्यायालयाच्या सुनावणीत नवाब मलिक यांना दिलासा नाही. त्यांचा मुक्काम आर्थर रोडच्या कारागृहात असणार आहे.


हे सुद्धा वाचा :

ठाकरे सरकार मा. नवाब मलीक मंत्री यांचा राजीनामा घेणार नसेल, तर यांच्या मंत्रालयातील ऑफीस समोरील नेमप्लेट वर जेलचा नंबर टाका

SC की फटकार के बाद कैसा महसूस कर रहे सिब्बल जी? फिल्ममेकर ने कपिल सिब्बल से किया सवाल तो मिले ऐसे जवाब

नवाब मलिक कांच्या राजीनाम्यासाठी भाजपकडून मुंबईत चक्का जामचा इशारा

मुंबई उच्च न्यायालयाने मंत्री नवाब मलिक यांना खडे बोल सुनावले

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी