मुंबईराजकीय

‘चंपाकली मुर्दाबाद’च्या घोषणा देत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जाळला चंद्रकांत पाटीलांचा पुतळा

राष्ट्रावादीच्या आमदार सुप्रिया सुळे यांनी घरात बसून स्वयंपाक करावा; आरक्षण द्या नाहीतर मसणात जा, अशी अपमानास्पद टिका करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्यांनी पुतळा जाळला.

टीम लय भारी

ठाणे : राष्ट्रावादीच्या (NCP) आमदार सुप्रिया सुळे यांनी घरात बसून स्वयंपाक करावा; आरक्षण द्या नाहीतर मसणात जा, अशी अपमानास्पद टिका करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष (Chandrakant Patil)  चंद्रकांत पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुतळा जाळला. (NCP burns statue of Chandrakant Patil)

'चंपाकली मुर्दाबाद'च्या घोषणा देत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जाळला चंद्रकांत पाटीलांचा पुतळा

राष्ट्रवादीच्या (NCP) ओबीसी परिषदेमध्ये संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांनी महाराष्ट्राची फसवणूक झाली असल्याचे विधान केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना, “खासदार आहात ना, समजत नसेल तर घरात बसा, स्वयंपाक करा. दिल्लीत जा मसणात जा; पण, आरक्षण द्या” ,अशी टीका चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली होती.

'चंपाकली मुर्दाबाद'च्या घोषणा देत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जाळला चंद्रकांत पाटीलांचा पुतळा

त्याविरोधात गृहनिर्माण (NCP) मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात जोरदार आंदोलन करण्यात आली. यावेळी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, चंपाकली (Chandrakant Patil) हाय हाय, चंद्रकांत पाटील मुर्दाबाद, आरक्षणासह निवडणूक झाल्याच पाहिजेत, अशा घोषणा दिल्या. सर्वात जास्त वेळा संसदरत्न बहुमानाने सुप्रियाताई यांना सन्मानित करण्यात आले आहे.

मात्र ज्यांना स्वतःच्या गावातील उमेदवारी वाचविता येत नाही, संन्यास घेण्याची घोषणा करून (NCP) पराभवानंतरही तोंड वर करून काहीही बरळत आहेत त्या चंद्रकांत पाटील यांना मनोविकारतज्ज्ञांकडे नेण्याची गरज आहे, अशी टीका करीत तसेच, चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेला कुंकू, नथीचे चित्र काढून त्यास जोडे मारले आणि आंदोलकांनी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचा पुतळाही जाळण्यात आला.

 

हे सुद्धा वाचा :- 

Congress report card recounts 8 ‘failures’ of Modi govt in 8 years

विलासराव देशमुखांचा ठाम विश्वास, कॉंग्रेस अशी तशी संपणार नाही

ईडीचा छापा पडताच ‘सूडबुद्धीची कारवाई’चा गजर सुरू : ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई

 

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close