महाराष्ट्रराजकीय

‘शरद पवार यांचे आभार कारण मी त्यांच्यामुळे डॉक्टर झालो’

आज सोशल मिडियाच्या जमान्यात सतत आपल्या कामाला लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी नेते मंडळी PR कंपन्याना नेमतात. सतत आपली प्रतिमान उंचावण्यासाठी धडपड करतात. मात्र शरद पवार यांनी या गोष्टींना महत्त्व दिले नाही. मातीतल्या नेत्याला अशा फुकट्या प्रसिध्दीची गरज वाटत नाही. आज सकाळी एक पोस्ट वाचण्यात आली.

टीम लय भारी 

'शरद पवार यांचे आभार कारण मी त्यांच्यामुळे डॉक्टर झालो'

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या शिवाय राज्याचे राजकारण पूर्ण होऊ शकत नाही. सतत कार्यकर्त्यांच्या घोळक्यात असणारे शरद पवार वयाच्या या टप्प्यांवर ही ते सतत प्रसिध्दीच्या झोत्यात असतात. शरद पवार हे साहित्य,सांस्कृतिक, शिक्षण आणि क्रिडा अश्या विविध क्षेत्रात ते सहज वावरतांना दिसतात. भारतीय राजकारणात शरद पवारांचे (Sharad Pawar) नाव मोठया आदराने घेतले जाते.

आज सोशल मिडियाच्या जमान्यात सतत आपल्या कामाला लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी नेते मंडळी PR कंपन्याना नेमतात. सतत आपली प्रतिमान उंचावण्यासाठी धडपड करतात. मात्र शरद पवार (Sharad Pawar) यांनी या गोष्टींना महत्त्व दिले नाही. मातीतल्या नेत्याला अशा फुकट्या प्रसिध्दीची गरज वाटत नाही. आज सकाळी एक पोस्ट वाचण्यात आली.

ही पोस्ट पुढील प्रमाणे…

साहेब….

22 वर्षे मागे वळून पाहताना या उत्तरार्धाने माझे आयुष्य बदलले.तुमच्या उदार आणि मदतीच्या हाताने हँड सर्जन म्हणून एक मार्ग निश्चित केला आहे.माझ्या करिअरच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर तुम्ही मला शिष्यवृत्ती दिली आहे, अन्यथा तो एमबीबीएसचा शेवटच्या वर्षाचा अभ्यास संपला होता. मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटण्याचा प्रयत्न केला आहे पण मला भेटता आले नाही, म्हणून साहेब तुमचे आभार मानण्यासाठी मी हे व्यासपीठ निवडले आहे. माझे वडील आणि तुम्ही साहेब माझे हिरो आणि आदर्श आहात कारण तुम्ही दोघांनी माझ्या व्यवसायाला आकार दिला आहे.मी तुम्हाला खूप निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देतो….साहेब आई भवानी तुम्हाला उद्दंड आयुष्य देवों!

'शरद पवार यांचे आभार कारण मी त्यांच्यामुळे डॉक्टर झालो'

सोबत एक पत्र ही जोडण्यात आलं आहे. हे पत्र साधारण २३-०४-२००० सालचं आहे. तब्बल २२ वर्षे  यी घटनेला उलटली. डॉ विजय आनंदराव माळशिकारे हे हँड सर्जन आहेत. सध्या डॉ विजय हे पुण्यातील जहांगीर हॉस्पिटल येथे प्रॅकटिस करत आहेत. विद्या प्रतिष्ठान, बारामती “ या शैक्षणिक संस्थातून डॉ विजय यांना शिष्यवृत्ती मिळाली.

आपल्या सर्वांसाठी ही बाब सामान्य असली तरीही डॉ विजय आनंदराव माळशिकारे यांच्यासाठी ही शिष्यवृत्ती खूप महत्त्वाची आहे. अशा कितीतरी गरजू विद्यार्थांना मदत मिळाली असले. मात्र शरद पवार यांनी या अशा मदतीला अधीच सार्वजनिक केले नाही. सध्याच्या काळात आपली प्रतिमा उंचावण्यासाठी निमित्त लागत मात्र शरद पवार (Sharad Pawar) यांना अशी गरज भासली नाही.

हे सुध्दा वाचा

देशाला राजकीयदृष्ट्या स्थैर्य देण्याचे काम कुणी केले असेल तर ते बाबासाहेबांनी : शरद पवार

Farmer approaches stage during NCP chief Sharad Pawar’s speech at farmers’ meet in Jalna, detained

महाराष्ट्रात भोंगा आणि हनुमान चालिसावरुन राजकीय चकमक सुरू

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close