32 C
Mumbai
Friday, March 22, 2024
Homeराजकीयपंतप्रधान मोदीजींच्या कार्यकाळात जेवण दुपटीने महागले : राष्ट्रवादी काँग्रेस

पंतप्रधान मोदीजींच्या कार्यकाळात जेवण दुपटीने महागले : राष्ट्रवादी काँग्रेस

टीम लय भारी 

मुंबई: मागील काही दिवसांपासून राज्यात हनुमान चालीसा, अजान, भोंगे यावरुन राजकारण होतं आहे. मात्र देशासह राज्यात महागाई वाढत आहे. यावर राष्ट्रवादीने मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) सोशल मीडियाच्या माध्यातून मोदीच्या कारभारवर टीका केली आहे. NCP criticize Modi government

देशात महागाई दिवसेंदिवस नवा उच्चांक गाठत आहे. गेल्या दहा वर्षात जेवण दुपटीने महागले असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी सत्तेत आल्यानंतरच्या ८ वर्षांच्या काळात महागाईचा आलेख चढतच चालला असून सर्वसामान्यांना घरखर्च चालवणे कठीण होऊन बसले आहे. महागाईमुळे त्रस्त झालेली जनता हेच का ते अच्छे दिन असा संतप्त सवाल  राष्ट्रवादीने (NCP) विचारला आहे.

२०१४ साली महागाईवर लक्ष करत मोदी सरकार सत्ते आले होते. मात्र अच्छे दिन एक निवडणुक जिंकण्यासाठी घोषणा केली असं मत राष्ट्रवादी केली आहे.किरकोळ महागाईने गेल्या आठ वर्षांतील विक्रम मोडत एप्रिलमध्ये उच्चांकी ७.७९ टक्के दर गाठला आहे. सरकारी आकडेवाडीनुसार मार्च २०२१ च्या तुलनेत मार्च २०२२ मध्ये अन्नधान्याच्या किमतीत ७.६८ टक्क्यांनी वाढ झाली. नोव्हेंबर २०२० नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. तर जानेवारी २०१४ ते मार्च २०२२ दरम्यान मध्यमवर्गीयांच्या मासिक बजेटमध्ये ४.४७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

होलसेल ॲण्ड रिटेल प्राइज इन्फॉर्मेशन सिस्टीमच्या अहवालानुसार मार्च २०१२ च्या तुलनेत मार्च २०२२ मध्ये किराणा सामानाच्या किमतीत ६८ टक्के वाढ झाली आहे. २०१२ मध्ये ८५० रुपयांत किराणा सामान भरले जायचे. त्याच किराणा सामानासाठी आता १६०० रुपये मोजावे लागत असल्याचे विविध रिपोर्टस् सांगतात.महागाईच्या झळांनी सर्वसामान्य होरपळत असताना केंद्र सरकार मात्र याबाबत एक चकार शब्द काढत नाही, मोदीजी हेच का तुमचे अच्छे दिन? असं म्हणतं राष्ट्रवादीने टीका केली आहे.

हे सुद्धा वाचा

फक्त एक रुपयात मिनी एमबीएचे प्रशिक्षण, मराठी तरुणांसाठी उद्यमी महाराष्ट्राचा अनोखा उपक्रम

Tripura: 11 MLAs Take Oath in CM Manik Saha’s Cabinet

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी