महाराष्ट्रराजकीय

श्रीलंकेसारखी परिस्थिती होण्याआधी जनतेने धर्मांध राजकारण बाजूला सारावे राष्ट्रवादीची नाव न घेता सरकरावर टीका

कर्नाटकमधील हिजाब प्रकरण, जेएनयूमध्ये श्रीराम नवमीला घडलेले हिंसक कृत्य, महाराष्ट्रात मशिदीवरील भोंग्यांचा विषय, हिंदूंनी अधिक मुलं जन्माला घालावीत अशी विधाने, याद्वारे समाजा-समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे.

टीम लय भारी 

श्रीलंकेसारखी परिस्थिती होण्याआधी जनतेने धर्मांध राजकारण बाजूला सारावे राष्ट्रवादीची नाव न घेता सरकरावर टीका

मुंबई:  राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) फेसबुक पोस्ट करत सध्याच्या राजकारणावर भाष्य केले आहे. राष्ट्रवादीने (NCP) आपल्या ऑफीशिअल पेज वरुन देशात सुरु असलेल्या राजकारणावर चिंता व्यक्त केली आहे. देशात महागाई सातत्याने वाढत आहे. मात्र देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. NCP criticize Modi government

कर्नाटकमधील हिजाब प्रकरण, जेएनयूमध्ये श्रीराम नवमीला घडलेले हिंसक कृत्य, महाराष्ट्रात मशिदीवरील भोंग्यांचा विषय, हिंदूंनी अधिक मुलं जन्माला घालावीत अशी विधाने, याद्वारे समाजा-समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे.

मार्च २०२२ महिन्यामध्ये घाऊक महागाईचा वार्षिक दर (WPI) १४.५५ टक्क्यांवर गेला आहे. हा दर मार्च २०२१ मध्ये ७.८९ टक्के होता. याचा अर्थ घाऊक बाजारातील महागाई मागच्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट झाली आहे. नैसर्गिक वायू, पेट्रोलियम उत्पादने, खनिज तेल, मूलभूत धातू इत्यादीच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती वाढत असल्यामुळे त्याचा परिणाम एकूणच सर्व स्तरातील महागाईवर झाला आहे.

पण या सर्व गदारोळात सर्वधर्मीय जनता महागाईमध्ये होरपळली जातेय. या धर्मांध राजकारणामुळे मूळ गंभीर विषयांना बगल दिली जात आहे. त्यामुळे आता जनतेनेच धार्मिक मुद्द्यांकडे लक्ष न देता महागाईवर सातत्याने केंद्र सरकारला प्रश्न विचारत राहिले पाहीजे. या पोस्ट मध्ये कोणाची नाव घेता राष्ट्रवादीने केंद्र सरकारवर टीका केली आहे.

हे सुद्धा वाचा: 

मुंबईत दंगली घडाव्यात हा भाजपचा उद्देश होता का? राष्ट्रवादीचा जोरदार घणाघात

BJP trying to create a communal situation in India, says NCP chief Sharad Pawar

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close