30 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्र'ना खाऊंगा ना खाने दुँगा' राष्ट्रवादीची मोदी सरकारवर टीका

‘ना खाऊंगा ना खाने दुँगा’ राष्ट्रवादीची मोदी सरकारवर टीका

टीम लय भारी 

मुंबई:  राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) सोशल मिडीयावर देशभरात वाढत जाणाऱ्या महागाई विरोधात मोदी सरकारवर टीका केली आहे. ‘ना खाऊंगा ना खाने दुँगा’  मोदी सरकारने आपला शब्द पाळला आहे. देशभरात महागाईने नवा उच्चांक गाठला आहे.भाजपने २०१४ साली वाढती महागाई आणि भ्रष्टाचाराचे चित्र लोकांपुढे उभे केले. यानंतर २०१४ साली सत्तेत आलेल्या मोदी सरकारने ‘ना खाऊंगा, ना खाने दुँगा’ अशी घोषणा केली होती. याचं वाक्याला केंद्र सरकारने सत्यात उतरवल्याचे चित्र निर्माण झाले आहे. NCP criticizes Modi government

देशातील महागाईने मागील आठ वर्षांतील महागाईचा उच्चांक गाठला आहे. ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) हा एप्रिल २०२२ या महिन्यात ७.७९ टक्क्यांवर पोहचला आहे. २०२१ च्या एप्रिल महिन्यात सीपीआय हा ४.२३ टक्के होता तर मार्च २०२२ मध्ये ६.९५ टक्के होता. भाजप सत्तेत आल्यापासून सामान्य जनतेला केवळ धक्केच दिले आहेत. देशभरात नोटबंदी, बेरोजगारी, गॅस दरवाढ आणि आता महागाईचा हा चढता आलेख यातून मोदी सरकार देशाला श्रीलंकेच्या वाटेवर घेऊन जाणार की काय अशी भावना सामान्य माणसाच्या मनात येत आहे. अशी टीका राष्ट्रवादीने केली आहे.

हे सुद्धा वाचा: 

बाळासाहेब ठाकरेंची बहिण संजीवनी करंदीकर यांचं पुण्यात निधन

Monsoon Set to Arrive Early, Scientists Predict Normal Downpour; Andaman to Get Season’s 1st Rain

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी