महाराष्ट्र

देशाला राजकीयदृष्ट्या स्थैर्य देण्याचे काम कुणी केले असेल तर ते बाबासाहेबांनी : शरद पवार

आजचा दिवस संबंध देशाच्या कानाकोपऱ्यात एका महापुरुषाचे स्मरण आणि सन्मान करण्याचा दिवस आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे या देशासाठीचे योगदान हे वादातीत आहे. या देशाला राजकीयदृष्ट्या स्थैर्य देण्याचे काम कुणी केले असेल तर ते बाबासाहेबांनी केले आहे. आपण १९४७ साली स्वतंत्र झालो, घटना समिती त्यानंतर झाली. १९५० ला आपण घटना स्वीकारली.

टीम लय भारी 

देशाला राजकीयदृष्ट्या स्थैर्य देण्याचे काम कुणी केले असेल तर ते बाबासाहेबांनी : शरद पवार

मुंबई: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती आज देशभरात साजरी केली जातेय. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे उपस्थितीत होते. NCP leader Sharad Pawar speech on Ambedkar Jayanti

शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाषणात असं म्हटलं की, आजचा दिवस संबंध देशाच्या कानाकोपऱ्यात एका महापुरुषाचे स्मरण आणि सन्मान करण्याचा दिवस आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे या देशासाठीचे योगदान हे वादातीत आहे. या देशाला राजकीयदृष्ट्या स्थैर्य देण्याचे काम कुणी केले असेल तर ते बाबासाहेबांनी केले आहे. आपण १९४७ साली स्वतंत्र झालो, घटना समिती त्यानंतर झाली. १९५० ला आपण घटना स्वीकारली. NCP leader Sharad Pawar speech on Ambedkar Jayanti

आज भारताच्या आजूबाजूला काय स्थिती आहे, ती आपण पाहत आहोत. शेजारी श्रीलंकेतील लोकशाही संकटात आली की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरा शेजारी देश पाकिस्तानमध्येही आज तशीच स्थिती आहे.

आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये एकप्रकारची स्थिरता राहिलेली नाही, ती अनेकदा उद्ध्वस्त होते, हे आपण पाहिले. पण आपला एवढा मोठा खंडप्राय देश असताना, अनेक जाती-जमाती, भाषा, प्रांत असताना सुद्धा या देशामधील स्थैर्य टिकून राहिलं. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान. त्यामुळे खऱ्या अर्थाने देश आज एकसंघ राहिलेला आहे.

आपण नेहमीच संविधानाबद्दलच्या त्यांच्या योगदानाचा उल्लेख करतो. तो महत्त्वाचा देखील आहे. या भाषणात त्यांनी म्हटलं आहे की,  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आपल्या देशाच्या अर्थकारणाला दिशा दिली आहे. सध्या महाराष्ट्रात विजेचा प्रश्न दिवस सतत चर्चेला येत आहे. तो म्हणजे विद्युत निर्मितीच्या कमतरतेचा. आज वीज कमी आहे, त्याचे दुष्पपरिणाम आज पाहायला मिळत आहेत. पण स्वातंत्र्याच्या आधी एक सरकार बनले गेले, त्या सरकारमध्ये विद्युत निर्मिती आणि जलसंधारण विभागाची जबाबदारी बाबासाहेबांकडे होती असं ही त्यांनी म्हटलं. NCP leader Sharad Pawar speech on Ambedkar Jayanti

या देशातील सर्वात महत्त्वाचे भाक्रा-नांगल या धरणाचा निर्णय बाबासाहेबांच्या सहीने झाला. नुसता पाण्याचा प्रश्न सुटला नाही. तर आपण कोळशापासून वीज तयार करतो, तेव्हा पाण्याच्या माध्यमातून वीज तयार करण्याची संकल्पना भाक्रा-नांगल परियोजनेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी मांडली आणि तिथे विद्युत निर्मितीचे काम केले.

सदर भाषणात त्यांनी म्हटलं, की  बाबासाहेब अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांचा पीएचडीचा थिसिस ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध लिहून त्यांनी रुपयाची अडचण मांडली होती. हा प्रबंध परदेशात स्वीकारला गेला. आज आपला देश उद्योगधंद्याच्या बाबतीत स्थिर झाला.

या देशाच्या उभारणीसाठी ज्यांचे प्रचंड योगदान होते, असा नेता कोण असा जर प्रश्न विचारला तर एकच नाव आठवते. आपल्या देशात अनेक मोठे नेते होऊन गेले, त्यांचा मी अनादर करू इच्छित नाही. पण आज तुम्ही देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेला तर गावागावात एका महामानवाचा पुतळा पाहायला मिळतो, ते महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

सामाजिक न्याय विभागाचे मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचे सहकारी, विभागाचे अधिकाऱ्यांचे शरद पवार यांनी आभार माणले आहे. पवारांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले आहे.

 

हे सुध्दा वाचा: 

आम्ही सगळे प्रबोधनकार वाचतो मात्र ठाकरे कुटुंबातील लोक वाचतात नसावेत – शरद पवार

“He’s Not Casteist”: Minister Slams Raj Thackeray For Sharad Pawar Remark

पाकिस्तानातील ‘शरीफ’ आणि बदमाष!

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close