30 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeराजकीयकश्मीर फाईल्स चित्रपटाचे निर्माते, कलाकार आणि समर्थक आज शांत का ? :...

कश्मीर फाईल्स चित्रपटाचे निर्माते, कलाकार आणि समर्थक आज शांत का ? : राष्ट्रवादी काँग्रेस

टीम लय भारी

मुंबई: मागील काही दिवसांपासून काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांची हत्या करण्यात आली आहे. काश्मिरी पंडितांना सातत्याने लक्ष्य केलं जात आहे.या मुद्दावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) मोदी सरकारला काही प्रश्न विचारले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून काश्मीरच्या प्रश्नावर भाजपवर टीका केली आहे. NCP on Kashmiri Pandit shot dead in J&K

काश्मीर खोऱ्यातून पुन्हा एकदा हिंदू बाहेर पडतोय. #KashmirFiles ची पुनरावृत्ती होतेय. तेव्हाही भाजपच्या पाठिंब्याचे सरकार होते, आजही केंद्रात भाजपचे सरकार आहे. फरक एवढाच आहे की, अनुपम खेर तेव्हा कलम ३७० काढून टाका म्हणून ओरड करत होते.

आज कलम ३७० काढून टाकले आहे, तरीही काश्मीर हिंदूची तीच अवस्था का? #KashmirFiles चे निर्माते, कलाकार आणि समर्थक आज शांत का? काश्मीर फाईल्स टॅक्स फ्री करा म्हणून महाराष्ट्र विधिमंडळाचा अमूल्य वेळ खर्च करणारे महाराष्ट्रातील भाजप नेते देखील शांत का? NCP on Kashmiri Pandit shot dead in J&K

जम्मू-काश्मीरमध्ये मागील आठ दिवसांपासून टार्गेट किलिंगच्या केले जात आहे. काश्मीरमधील हिंदूंना  सातत्यानं लक्ष्य केले जात आहे. बँक कर्मचाऱ्याची आणि एका बिहारी कर्मचाऱ्याची काश्मिरीमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर काश्मीरमधील 30 ते 40 कुटुंबांनी काश्मीर सोडलं आहे, अशा बातम्या समोर येत आहे.

हे सुद्धा वाचा: 

गोपीनाथर मुंडे यांचा स्मृतिदिन ‘संघर्षदिन सन्मान’ म्हणून साजरा करण्यात आला

Punjab CM Bhagwant Mann visits Sidhu Moosewala’s home in Mansa, expresses condolences to family

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी