29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात हातातून सत्ता गेल्याने विरोधकांची प्रमाणापेक्षा अधिक तडफड होत आहे :  रोहित...

राज्यात हातातून सत्ता गेल्याने विरोधकांची प्रमाणापेक्षा अधिक तडफड होत आहे :  रोहित पवार

टीम लय भारी 

मुंबई:  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विटरच्या माध्यमातून शरद पवार यांच्यावर टीका केली होती. या टीकेला रोहित पवार (Rohit Pawar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये असं म्हटलं की, राज्यात हातातून सत्ता गेल्याने विरोधकांची प्रमाणापेक्षा अधिक तडफड होताना दिसतेय. विरोधक अर्धवट माहिती देत आहे.

काही संदर्भ लपवून ठेवत लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करत आहे. विरोधक बेछूट आरोप करून ६ दशकं संसदीय राजकारणाच्या माध्यमातून लोकसेवा करणाऱ्या पवार साहेबांना बदनाम करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे.

सत्तेच्या लालसेपायी पवार साहेबांना बदनाम करण्यासाठी सामाजिक तणाव निर्माण करून नागरिकांनी कष्टाने उभ्या केलेल्या घरांना आग लावण्यास आणि माणसांचा जीव घेण्यासही अशा प्रवृत्तीचे लोक मागंपुढं पाहणार नाहीत.

पण विरोधकांकडून इतर राज्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या या अमानवी प्रकाराला छत्रपती शिवराय आणि शाहू-फुले-आंबेडकर यांचा पुरोगामी महाराष्ट्र कधीही थारा देणार नाही! शिवाय राज्यातील माँ जिजाऊ, सावित्रीमाई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या लेकीही तसं होऊ देणार नाहीत असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. आपल्या दुसऱ्या पोस्ट मध्ये

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या व्हिडीओ शेअर केला आहे. या पोस्ट मध्ये त्यांनी म्हटलं की, आदरणीय शरद पवार साहेब खोटं बोलले आणि त्यांच्या या बोलण्याचा आम्हाला  अभिमान आहे!

साहेबांच्या त्या बोलण्यामुळं मुंबईत जातीय दंगल घडवण्याचे ISI चे मनसुबे उधळले गेले आणि म्हणूनच राष्ट्रपती असताना खुद्द स्व. प्रणव मुखर्जी साहेबांनीही पवार साहेबांना आणि मुंबईला सलाम केला होता.

राज्यात दंगल भडकवण्याच्या ISI च्या प्रयत्नांना उधळून लावत आदरणीय पवार साहेबांनी तेंव्हा राज्यात शांतता प्रस्थापित केली होती. पण आज दंगल भडकवून त्या आगीत राजकीय पोळी भाजण्याचा तर कुणाचा प्रयत्न नाही ना?

पत्रकार निखिल वागळे यांनी पवारांची मुलाखत घेतली होती ती मुलाखत शेअर केली आहे.  रोहित पवारांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. “शरद पवार खोटं बोलले असा आरोप विरोधकांनी केला. आम्ही म्हणतो हो बोलले! पण ते का खोटं बोलले? हे अपप्रचार करणाऱ्या लोकांपासून लपवून ठेवायचंय! खास त्यांच्यासाठी हा व्हिडीओ”, असं रोहित पवार यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

हे सुध्दा वाचा: 

ढोंगी व स्वार्थी राजकारणाला जनतेने कोल्हापूरमध्ये ‘उत्तर’ दिले : रोहित पवार

Rohit Pawar in Karjat Jamkhed Election Results 2019: Rohit Pawar of NCP Wins

गिरगाव चौपाटीवरील व्हिविंग गॅलरीचे लोकार्पण

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी