28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमहाविकास आघाडी सरकारला बदनाम करुन नेत्यांवर सुड उगवायचा ही गोष्ट लोकशाही दृष्टीकोनातून...

महाविकास आघाडी सरकारला बदनाम करुन नेत्यांवर सुड उगवायचा ही गोष्ट लोकशाही दृष्टीकोनातून योग्य नाही – महेश तपासे

टीम लय भारी 

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. त्यावर महेश तपासे (NCP) यांनी संताप व्यक्त केला आहे.खासदार संजय राऊत यांची ईडीने मालमत्ता जप्त केली आहे याचा अर्थ महाविकास आघाडी सरकारला बदनाम करायचं.नेत्यांवर सुड उगवायचा ही गोष्ट लोकशाही दृष्टीकोनातून योग्य नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (NCP slams BJP over Sanjay Raut ED Action)

महाविकास आघाडी सरकारची अजून एक मुलुखमैदान तोफ संजय राऊत यांची मालमत्ता ईडीने जप्त केली अशी बातमी वाचली. काय चाललंय? असा संतप्त सवाल महेश तपासे यांनी केला आहे.सन २०१९ मध्ये सरकार बनवता न आल्याने भाजप सुडाचं राजकारण करुन महाविकास आघाडीचे बलशाली नेत्यांना टप्प्याटप्प्याने टार्गेट करत आहे असेही महेश तपासे म्हणाले.

संजय राऊत सातत्याने भाजप आणि केंद्रीय यंत्रणांवर बोलत होते त्यामुळे त्यांची मालमत्ता व राहतं घर ईडीने जप्त केलं आहे. अशापध्दतीने सुडाचं राजकारण ईडीच्या माध्यमातून भाजप करत आहे असेही महेश तपासे यांनी सांगितले.

ईडीच्या अधिकार्‍यांवर खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले होते. त्या आरोपानंतर गृहविभागाने एसआयटी स्थापन करुन चौकशी सुरू केली होती आणि आज ईडीने खासदार संजय राऊत यांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली हा योगायोग आहे का असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.


हे सुद्धा वाचा : 

Sanjay Raut in trouble! ED attaches assets linked to Shiv Sena MP in PMLA probe

अखेर ईडीची संजय राऊतांच्या घरी धाड, मुंबई आणि अलिबागमधील मालमत्ता जप्त

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी