34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeराजकीय'लायकीपेक्षा जास्त बोलू नका', निलेश राणे यांचा केसरकरांना सल्ला

‘लायकीपेक्षा जास्त बोलू नका’, निलेश राणे यांचा केसरकरांना सल्ला

टीम लय भारी

कणकवली : सोशल मिडीयावरील टीकात्मक पोस्टमुळे निलेश राणे नेहमीच नेटकऱ्यांच्या चर्चेच असतात, यावेळी पोस्टमधून शिंदे गटातील दीपक केसरकर यांची लायकी काढल्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. यावेळी लायकीपेक्षा जास्त बोलू नका असे म्हणून आमदार राणे यांनी केसरकरांना सुनावले आहे.

शिंदे गटातील प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शिंदे गटाच्या विचारधारेशी सहमती दर्शवली असली तरीही पदोपदी मातोश्री सोबतचे नाते ते कायम जपताना दिसतात. दरम्यान कायम शिवसेना, मातोश्रीला टार्गेट करणारे निलेश राणे यांच्यावर त्यांनी न राहवून शाब्दिक भडिमार केला आणि मातोश्रीची पाठराखण केली.

दरम्यान, भाजपच्या कोणत्याही नेत्याने उद्धव ठाकरे किंवा मातोश्री विरोधात टीका करू नये, ती आम्ही खपवून घेणार नाही, अशी भूमिका केसरकर यांनी घेतली, त्याला प्रत्यूत्तर देत निलेश राणे यांनी सोशल मिडीयावर केसरकरांवर जोरदार हल्लाबोल चढवला.

निलेश राणे ट्वीटमध्ये लिहितात, दीपक केसरकर इज्जत मिळते तर ती घ्यायला शिका, लायकी पेक्षा जास्त बोलू नका आणि उद्धव ठाकरे यांचा एवढा पुळका असेल दीपक केसरकरांना तर जाऊन मातोश्रीवर त्यांची भांडी घासा अशा तीव्र शब्दांत केसरकरांवर टीका केली आहे.

केवळ इतक्यावर न थांबता निलेश राणे यांनी व्हिडिओ सुद्दा सोशल मिडीयावर पोस्ट करून केसरकरांना चांगलेच धारेवर धरले आहे. व्हिडिओत राणे म्हणतात, दीपक केसरकर, आपण अलायन्समध्ये आहोत, हे विसरू नका. अलायन्स टिकवण्याची जबाबदारी जेवढी आमच्यावर आहे, तेवढीच जबाबदारी तुमच्यावर देखील आहे. तुम्ही शिंदे साहेबांच्या गटाचे प्रवक्ते असू शकता, आमचे नाही.  तुमची लायकी आम्हाला चांगली माहीत आहे, त्यामुळे तुम्ही कशाला उड्या मारता?

राणे पुढे म्हणाले, मतदारसंघात तुमची काय अवस्था आहे, हे आम्हाला माहीत आहे.  तुम्हाला कुबड्या मिळाल्या आहेत. त्या कुबड्यावर तरी व्यवस्थित चाला, नाहीतर मतदार संघात तुमचा विषय आटोपला होता. तुम्हाला दुसरं राजकीय जीवनदान मिळालं आहे, हे विसरू नका. इज्जत मिळतेय तर इज्जत घ्यायला शिका, नाहीतर तुम्हाला माहिती आहे,आम्ही काही गप्प बसणार नाही,” अशा धमकीवजा शब्दांत राणे यांची खरडपट्टी काढली आहे.

सोशल मिडीयावरील राणे – केसरकर यांच्या  घमासान शाब्दिक वादावादीनंतर, बेताल वक्तव्यांनंतर भाजप आणि शिंदे शिवसेना यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे, त्यामुळे यावर राजकीय पक्षांतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया सध्या पाहायला मिळत आहे.

हे सुद्धा वाचा…

मुख्यमंत्री कार्यालयातील सहसचिव अरुण बेळगुद्री यांचे निधन

‘मुसळधार’मुळे आज शाळेला सुट्टी

प्रचारासाठी ‘शरद पवार‘ मैदानात उतरणार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी