30 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमुंबईरंगरंगोटीच्या पलिकडे मुंबई महानगरपालिका काहीच करताना दिसत नाही : नितेश राणे

रंगरंगोटीच्या पलिकडे मुंबई महानगरपालिका काहीच करताना दिसत नाही : नितेश राणे

टीम लय भारी :

मुंबई : काही दिवसांवरच पावसाळा सुरु होणार असून, दरवर्षी मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचते. त्यामुळे नागरिकांचा मोठ्या प्रमाणात खोळंबा होतो. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंबई महानगरपालिकेवर निशाणा साधलाय. (Nitesh Rane targets Mumbai Municipal Corporation)

पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते अशीच मुंबईची ओळख सातत्यानं प्रसारमाध्यमे देतात. परंतु या तुंबलेल्या मुंबईत अनेकांनी आपले हकनाक जीव गमावले तरीही त्यावर ठोस उपाययोजना म्हणून मुंबई महापालिकेत दिर्घकाळ सत्ता भोगणारी शिवसेना मात्र काहीही करू शकलेली नाही. मुंबईला नुसती ठेकेदारांच्या फायद्यासाठी रंगरंगोटी आणि देखावा करून गतवैभव प्राप्त होणार नाही. त्यासाठी जनतेच्या मुळ समस्येकडे पण लक्ष दिले पाहिजे. यावर्षी चांगला पाऊस होण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत, असा टोला नितेश राणे (Nitesh Rane) यांनी लगावला आहे.

त्यामुळे पावसाळ्यात मुंबईची काय परिस्थिती असेल याची कल्पना करवत नाही. तुंबणाऱ्या या मुंबईत ३८६ असे धोक्याचे ठिकाणं आहेत. ज्याला आपण फ्लडींग पॉईंटस म्हणतो. यापैकी २८ ठिकाण एकाच पश्चिम विभागतील आहेत. फक्त माटुंगा, वडाळा. सायन भागतच यातील २५ फ्लडींग पॉईट्स आहेत. यंदाच्या पावसाळ्यात समुद्राला २२ दिवस भरतीही असणार आहे. त्यामुळे मुंबईत सलग २५० मिली पेक्षा अधिक पाऊस पडला तर मुंबईला २६ जुलैच्या परिस्थितीची आठवण येईल की काय? अशी भिती व्यक्त केली जात आहे, असे नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले.

पावसाच्या पाण्याचा निचरा या फ्लडींग पॉईंट्स येथून झाला नाही तर मुंबईकरांना भीषण परिस्थितीच तोंड द्यावं लागेल. या फ्लडींग पाईंट्स येथे पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप लावण्याच्या पलिकडे आपण काय उपाय योजना केल्या आहेत? हे आम्हा जनतेस कळाले पाहिजे, असे नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले.

राज्य सरकार व पालिका प्रशासन या संवेदनशील मुद्द्यावर विविध विभागांचे मत लक्षात घेता काही धोरण आखणार आहे का? तेथील नागरिकांना अशा संभाव्य आपत्तीजन्य परिस्थितीत काय उपाययोजना करायच्या असतात या विषयी आपण काही जनजागरण केलं आहे का? या सर्व प्रश्नांची आपण समाधान साधणार आहात की नेहमीप्रमाणे मुंबईला तुंबई म्हणून देश व जागतिक स्तरावर बदनाम करणार आहात, असे नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले.


हे सुद्धा वाचा : 

नितेश राणे अकबरुद्दीना औरंगजेबाकडे आठवण्याच्या तयारीत, फक्त पोलिसांना १० मिनिटे बाजूला करा…

नितेश राणे यांचा गिरगाव चौपाटीवरील प्रेक्षक गॅलरीवरुन आदित्य ठाकरे यांना टोला

पर्यावरण मंत्र्यांच्या हट्टामुळे पैशांचा गैरवापर होतोय , मुंबईचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना नितेश राणेंनी धाडले पत्र

नितेश राणेंचा पोलीस कोठडीतला मुक्काम अजूनच लांबला

केवळ आर्थिक राजधानी नाही; महाराष्ट्र ही संत, वीर योद्धे व समाज सुधारकांची भूमी : भगत सिंह कोश्यारी

वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेता  संजय राऊतांची फडणवीसांवर टीका

Nitesh Rane writes to Maharashtra CM Uddhav Thackeray, highlights issue of water logging in Mumbai

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी