29 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeराजकीयनितेश राणेंचा पोलीस कोठडीतला मुक्काम अजूनच लांबला

नितेश राणेंचा पोलीस कोठडीतला मुक्काम अजूनच लांबला

टीम लय भारी

सिंधुदुर्ग:- भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावरचा अडचणी दिवसेंदिवस वाढत जात आहेत. सतत जामीन अर्जासाठी धावाधाव करत असून देखील आता पुन्हा नितेश राणे यांना अजून काही काळ पोलीस कोठडीत काढावा लागणार आहे.(Nitesh Rane’s stay in police custody is still long)

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे आज (सोमवारी) सुट्टी जाहीर करण्यात आली  असल्यामुळे सरकारी कामे पुढे ढकलण्यात आली, त्यामुळे आजची सुनावणी देखील पुढे ढकलली गेली आहे.

हे सुद्धा वाचा

ओवेसींच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याची चौकशी सुरू आहे, त्यांना सुरक्षा स्वीकारण्याचे आवाहन करा, अमित शहा

शिवसेनेचा हेतू मला मारण्याचा होता,किरीट सोमय्यांचा धक्कादायक आरोप

नितेश राणे यांना पोलीस कोठडी की न्यायालयीन कोठडी?

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी ४ फेब्रुवारीला नितेश राणे यांची रवानगी कणकवली न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत केली. जेलमध्ये न जाता नितेश राणे यांनी  छातीत दुखत असल्याचे सांगितले, त्यामुळे त्यांना त्या अवस्थेचे सिंधुदूर्ग जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. मात्र सिंधुदूर्ग जिल्हा रुग्णालयात हृदय रोग तज्ज्ञ नसल्याने कोल्हापूर जिल्हा रुग्णालयात हलवण्याची तयारी सुरू झाली.

मुंबईत पाठवलेले वैद्यकीय अहवाल येणे अजूनही बाकी आहे  या प्रकरणी आज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार होती. पण मात्र आज सार्वजनिक सुट्टी जाहीर झाल्यामुळे आजचे न्यायालयाचे कामकाज बंद झाले. त्यामुळे आता नितेश राणेंच्याप प्रकरणी जामीनावर उद्या मंगळवारी सुनावणी होईल.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी