28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeमहाराष्ट्रनितीन गडकरींचा भ्रष्टाचार बाहेर काढणार : हेमंत पाटलांचा इशारा

नितीन गडकरींचा भ्रष्टाचार बाहेर काढणार : हेमंत पाटलांचा इशारा

टीम लय भारी

महाराष्ट्र : केंद्रीय रस्ते विकास मंत्री भाजपाचे जेष्ठ नेते नितीन गडकरी यांचा रस्ते विकासातील भ्रष्टाचार काही महीन्यातच लकाढणार असल्याचे एका दिल्लीतील कार्यक्रमात बोलताना इंडिया अगेन्स्ट करपशन चे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील (Hemant Patil) म्हणाले ते पुढे म्हणाले की, एखाद्याला रस्ता बनवण्याचे टेंडर घ्यायचे असेल तर ते टेंडर नितीन गडकरींना भेटल्या शिवाय पास होत नाही आणि ऑनलाईन टेंडर भरल्यास ते टेंडर मिळण्यासाठी रस्ते विकासातील अधिकाऱ्याच्या सहमती शिवाय मिळत नाही याबाबतीत बोलताना हेमंत पाटील (Hemant Patil) म्हणाले की गुजरात महाराष्ट्र उत्तर प्रदेश दिल्ली पंजाब येथील रस्ते बनवण्याचे काम हे नितीन गडकरीनी आपल्या मर्जीतील कंपन्यांना दिले आहे.(Nitin Gadkari’s corruption will be exposed: Hemant Patil’s warning)

यात 1 लाख कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे या बाबत मी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संबंधित व्यक्ती शी संबंध साधला असता यात उडवाउडवींची उत्तरे मिळत आहेत आणि माहीती अधिकारात (Hemant Patil) माहिती मागितली असता त्या बाबतीत योग्य ती माहीती मिळत नाहीत आणि टेंडर हे फुगवुन व मटेरियल चे रेट हे भरमसाठ लावले आहेत व टेंडर हे एका कंपनीला देऊन त्यात तुकडे तुकडे पाडुन ते अनेक कःपनीला दिले जात आहे व जीएसटीची शासनाची रक्कम भरली जात नसल्याचे दिसून येत आहे.

मोठमोठी देशातील कामे फक्त अंबानी व अडाणीलाच का दिली जात आहेत याबाबतीत नितीन गडकरींनी खुलासा करणे गरजेचे आहे आणि तक्रारी करुनही दखल घेतली नसल्या मुळे हेमंत पाटील (Hemant Patil) नाराज आहेत मा नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना भेटुन काही दिवसांत या बद्दल आवाज उठवुन आम्ही देशात जनजागृती करणार आहे व तरी सुद्धा दखल न घेतल्यास सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे हेमंत पाटील (Hemant Patil) म्हणाले.

हे सुद्धा वाचा :- 

काशीळ सोसायटी जिल्ह्यात एक नंबर : हेमंत पाटील

‘विक्रांत फाईल्स’ प्रकरणी सोमय्या पिता-पुत्राचा, अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी