28 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रअखेर वीजकपातीवर राज्य सरकारचा तोडगा निघाला, नितीन राऊत यांची माहिती

अखेर वीजकपातीवर राज्य सरकारचा तोडगा निघाला, नितीन राऊत यांची माहिती

टीम लय भारी 

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रात वीजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेय. अशातच राज्यभरात कोळशाच्या तुटवड्यामुळे वीजनिर्मितीवर मर्यादा आल्या. त्यामुळे भारनियमाची टांगती तलवार महाराष्ट्राच्या डोक्यावर आहे. मात्र हे भारनियम टाळण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा मोठा निर्णय घेतलाय. राज्यात लोडशेडिंग होऊ नये आणि 24 तास वीज मिळावी यासाठी आज मंत्रिमंडळ बैठकीत विषय आला होता. केंद्रांच्या दरापेक्षा कमी दरात वीज खरेदी करण्याचा मंत्रीमंडळ बैठकीत  निर्णय घेण्यात आला, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी दिला आहे. (Nitin Raut informed that the state government has come up with a solution on power cut)

राज्यातील विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन भारनियमन टाळण्यासाठी महावितरणला वीज खरेदी करण्यास मान्यता देण्यात आलेय. राज्यातील वीज निर्मिती आणि उपलब्धतेची परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत किंवा १५ जूनपर्यंत वीज खरेदी करता येणार असल्याची माहिती राज्य सरकारने दिलेय.

राज्यातील विजेची वाढती मागणी आणि उपलब्ध विजेचा तुटवडा पाहता कोस्टल गुजरात पॉवर लिमिटेड(CGPL)कडून ७६० MW वीज खरेदी करण्याचा निर्णय ऊर्जा विभागाने घेतला आहे. या निर्णयाला पाठिंबा दिल्याबद्दल बाळासाहेब थोरात यांचे आभार ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मानले आहेत.

याशिवाय राज्यातील वीज टंचाई व भारनियमनाचे संकट लक्षात घेता खासगी वीज कंपन्यांकडून वीज विकत घेण्याचे अधिकार महावितरणला देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतला.राज्याला वीज संकटातून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री यांनी पुढाकार घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.


हे सुद्धा वाचा :- 

Dr. Nitin Raut : डॉ. नितीन राऊत धावले मोदी सरकारच्या मदतीला

पवारांनी केली ईडीची काडी!

बाळासाहेब थोरांतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी