29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीयफडणवीस सरकार नाही तर, शिंदे सरकार

फडणवीस सरकार नाही तर, शिंदे सरकार

टीम लय भारी

मुंबई : महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असेच सर्वांना वाटले होते. परंतु आता एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आली आहे. गुरुवारी संध्याकाळी फक्त एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी आज राजभवनात होणार आहे.

सत्तालोलूप एकनाथ शिंदेनी शिवसेनीशी बंडखोरी करुन मुख्यमंत्री पदाची खूर्ची ओढून घेतली. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असे सर्वांनाच वाटत होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केल्याचे घोषित केले. त्यामुळे या निर्णयाने संपूर्ण राज्याला धक्काच बसला आहे. शिवसेनेत राहून देखील एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री पद देण्यास शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे तयार होते. तरी देखील एकनाथ शिंदे बंडखोर नेत्यांसह भाजप सोबत राहिले. अखेर बंडखोरी करुन त्यांनी सत्ता हस्तगत केली असली तरी त्यांना देवेेद्र फडणवीस यांचा मोठा पाठिंबा आहे. म्हणजेच काय तर देवेद्र फडवीस सांगणार तसेच यांना वागावे लागणार आहे. हे सरकार शिवसेनेच्या विचारांवर नाही तर भाजपच्या विचारांवर चालणार आहे.

हे सुद्धा वाचा :

‘तीन‘ वर्षात ‘चार‘ वेळा सरकार कोसळले

पंकजा मुंडे मंत्रिपदापासून वंचित

भाजप आमदारावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा; उच्च न्यायालयाने नाकारला आहे जामीन, तरीही मंत्रीपदासाठी लॉबिंग !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी