34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रउध्दव ठाकरे फडणवीसांशी बोलले ही सकारात्मक बाब; आता शिंदेना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रयत्न...

उध्दव ठाकरे फडणवीसांशी बोलले ही सकारात्मक बाब; आता शिंदेना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रयत्न करावे

टीम लय भारी

गुवाहाटी : आम्हाला चांगले डिपार्टमेंट नको. हे आम्ही मान्य केले. पक्ष प्रमुखांना मुख्यमंत्री बनवण्यास आम्ही तयार झालो. आम्ही ज्यांच्याबरोबर मतं मागितली त्याच पक्षासोबत आम्हाला युतीमध्ये राहायचे होते. परंतु पक्ष प्रमुखांनी ते ऐकले नाही. आता आम्ही भाजप बरोबर पुन्हा युती करण्याची त्यांना विनंती करत आहोत. यापूर्वी अनेक वेळा आम्ही त्यांना सांगितले, परंतु ते मान्य करायला तयार नाहीत. त्यामुळे आम्हाला हा बंडाचा निणर्य घ्यावा लागला असे एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी माध्यमांना सांगितले.

मुख्यमंत्री राजीनामा देण्यास तयार होते. परंतु शरद पवारांनी त्यांना रोखले. पक्ष प्रमुखांबरोबर राहून त्यांची ताकद वाढणार आहे. आम्ही शिवसेनेमध्येच आहोत. एकनाथ शिंदे यांना तुम्हीच आमचे नेते बनवले. आता आम्हाला गद्दार म्हणता. लोकांची दिशाभूल करु नका. दीड वर्षे आम्ही हे सांगत होतो. पण आपण ऐकले नाही. आता शेवटचे सांगतो, राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस बरोबर युती नको. असे बंडखोर नेत्यांच्यावतीने एकनाथ शिंदेंनी सांगितले.

औरंगाबादला संभाजीनगर करण्याचे मनावर का घेत नाही. तर काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीचा या नामांतरणाला विरोध आहे. केंद्र आणि राज्याच्या संघर्षांत महाराष्ट्र गाडा अडकला आहे. परंतु भाजप बरोबर युती केली की, हे सगळे प्रश्न सुटणार आहेत. तुम्हाला पुढे नेणारे आम्ही गद्दार आहोत का? असा खडा सवाल दीपक केसरकरांनी उध्दव ठाकरेंना विचारला. या 50 आमदारांच्या भावना आहेत. असेही ते यावेळी म्हणाले.

शिवसेना पक्ष प्रमुख म्हणून यावर विचार करून भाजपच्या पक्षश्रेष्ठींशी विचार विनिमय करावा. माझा शिवसैनिक मुख्यमंत्री पदाच्या खूर्चीत बसला पाहिजे, असे तुम्हालाच वाटत होते. मग आमच्या मतांचा विचार करा. एकनाथ शिंदेंना रिक्षावाला म्हणून हिणवण्याची कुठली पध्दत आहे. लवकर निर्णय घेतला तर महाराष्ट्रात तयार झालेली ही सत्ता कोंडी फुटेल.

हे सुध्दा वाचा:

नवी मुंबई विमानतळ नामकरणाच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदेंनी लावली भांडणे

सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझे पती सदानंद सुळेंशी भांडण झाले तर…

राज्यपाल विशेष अधिवेशन बोलावतील का?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी