29 C
Mumbai
Tuesday, March 26, 2024
HomeUncategorizedवसई : मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेचा पाठलाग करुन अश्लील वर्तन, टवाळखोराला स्थानिकांनी...

वसई : मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेचा पाठलाग करुन अश्लील वर्तन, टवाळखोराला स्थानिकांनी चोपला

टीम लय भारी

पालघर : मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेचा पाठलाग करुन तिच्यासोबत अश्लील वर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर टवाळखोराला नागरिकांनी चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. मुंबईजवळच्या वसईत शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे(Obscene behavior by chasing a woman doing a morning walk).

काय आहे प्रकरण?

संबंधित महिला आज (शुक्रवार) सकाळी सहा वाजताच्या सुमारास मॉर्निंग करत होती. त्यावेळी शेष पाल नावाच्या तरुणाने तिचा पाठलाग सुरु केला. त्यानंतर तिच्याशी अश्लील वर्तन केल्याचा आरोप आहे. वसईतील पश्चिम भागात सनसिटी परिसरात ही घटना घडली आहे.

शिक्षकाचा अश्लील कारनामा; विद्यार्थ्यांच्या WhatsApp ग्रुपवर पाठवला पॉर्न व्हिडिओ, सांगितलं विचित्र कारण

परमबीर सिंह यांच्यासह अनेकांवर गुन्हा दाखल

स्थानिकांनी आरोपीला चोपला

हा प्रकार आजूबाजूने चालणाऱ्या नागरिकांना समजल्यावर त्यांनी धावत जाऊन माथेफिरुचा पाठलाग केला. आरोपीला पकडून त्याला स्थानिकांनी चांगलाच चोप दिला. त्यानंतर वसईतील माणिकपूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

या घटनेमुळे पहाटेच्या सुमारास चालायला येणाऱ्या महिलांमध्ये काहीसं तणावाचं वातावरण पसरलं आहे. महिला सुरक्षेचा प्रश्न जरी ऐरणीवर आला असला, तरी सतर्क महिलेच्या धाडसामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षावही होत आहे.

‘मुघल निर्वासित आहेत’ म्हटल्याबद्दल नसीरुद्दीन शाह मोठ्या प्रमाणात ट्रोल

Kandivli crime: Man held for running clinic with fake medical degree for 20 year

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी