38 C
Mumbai
Tuesday, April 16, 2024
Homeएज्युकेशनयंदा आयटीआय प्रवेशासाठी दीड लाख जागा उपलब्ध

यंदा आयटीआय प्रवेशासाठी दीड लाख जागा उपलब्ध

टीम लय भारी

मुंबई : दहावीचा निकाल जाहीर झाला असून विद्यार्थ्यांची विविध महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश प्रक्रिया घेण्यासाठी लगबग सुरु झाली आहे. यंदा आयटीआयकडून १ लाख ४९ हजार २६८ जागांची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी आयटीआय प्रवेशाच्या जागा कमी झाल्या आहेत. आयटीआय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांना https://admission.dvet.gov.in/ या संकेस्थळावरून ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. याबाबतची संपूर्ण माहिती या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्यातील एकूण ९७२ आयटीआय केंद्रांमध्ये या जागा भरण्यात येणार आहेत.

दहावीनंतर डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी हे आयटीआय प्रवेशासाठी देखील इच्छुक असतात, त्यामुळे आयटीआयमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस दिसून येते. आयटीआयमधून आता विद्यार्थ्यांना नवनवीन अभ्यासक्रमांचे शिक्षण घेता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आयटीआय प्रवेश प्रक्रियेकडे कल असल्याचे पाहावयास मिळत आहे.

गेल्या काही वर्षात बहुतांश विद्यार्थ्यांनी आयटीआयमधील अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी आपली प्रथम पसंती दर्शविली आहे. आयटीआयच्या अनेक संस्था या शासकीय असल्याने यामधून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या अनेक संधी प्राप्त होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची देखील प्रवेश घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे जमा करण्यासाठी लगबग सुरु आहे.

दि. १७ जून २०२२ पासून आयटीआय प्रवेशासाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांना एक महिना प्रवेशासाठी हा ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. परंतु प्रवेश अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देखील मिळू शकते. यानंतर विद्यार्थ्यांना २२ जून २०२२ प्रवेश अर्ज निश्चित करता येणार आहेत.

हे सुद्धा वाचा :

राज्य सरकारकडून मेगा भरती; दीड हजार लिपिकांची पदे भरणार

अबब ! मंत्री बाळासाहेब पाटील यांचा ‘गाढव’छाप कारभार; राष्ट्रवादीच्या नेत्यानेच उघडे पाडले पितळ

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी