28 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमुंबई'आमचे आमदार आमच्यासोबत'

‘आमचे आमदार आमच्यासोबत’

टीम लय भारी

मुंबई : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमचे 44 आमदार आमच्या सोबत असल्याचे त्यांनी सांगितले. आमचे सगळे आमदार मुंबईत आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंवर आमचा विश्वास असून, महाविकास आघाडीचे सरकार पडणार नाही, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी दाखवला. तसेच रा. काँग्रेसचे आमदार देखील त्यांच्यासोबत आहे. बाळासाहेब थोरातांनी ‘ऑल इज वेल‘ म्हटले आहे. परंतु बाळासाहेब थोरात तणावात होते. शिवसेनेच्या एका नेत्याच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आले आहे. त्यामुळे काॅंग्रेस आणि रा.काॅंग्रेसचे सर्वच नेते तणावात आहेत.

बाळासाहेब थोरातांनी सांगितले की, मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झालेली आहे. एकनाथ शिंदेंची नाराजी कायम आहेत. अजून कोणताही तोडगा निघालेला नाही. महाविकास आघाडीचे सरकार पडले तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते. आता राजकारणाचे केंद्रबिंदू राज्यपाल आहेत. सत्तेत राहायचे असेल तर महाविकास आघाडी सरकारला बहूमत सिध्द करावे लागेल.

विश्वास दर्शक ठराव मांडून देखील हे सरकार टिकवता येवू शकते. यापूर्वी विलासराव देशमुख, नारायण राणे यांच्यावेळी विश्वास दर्शक ठराव मांडण्यात आला होता. ही प्रक्रिया विधीमंडळात यावी केली जावू शकते. मात्र विधान परिषदेत विश्वास दर्शक ठराव सिध्द केला पाहिजे. विशेष अधिवेशन घेवून अधिवेश बोलवून हा ठराव मांडता येवू शकतो.

हे सुद्धा वाचा :

’90 टक्के शिवसैनिकांशी चांगले संबंध’

आनंद दिघे, एकनाथ शिंदे नंतर ठाण्याची धूरा कोणाकडे ?

शिवसैनिकांनी दिला गद्दारांना शाप

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी