31 C
Mumbai
Wednesday, February 1, 2023
घरफोटो गॅलरीPHOTO: चित्रपटगृहात येण्यापूर्वीच 'अवतार 2' ने केला करोडांचा गल्ला....

PHOTO: चित्रपटगृहात येण्यापूर्वीच ‘अवतार 2’ ने केला करोडांचा गल्ला….

'अवतार 2' मध्ये 2009 साली प्रकाशीत झालेल्या बहुचर्चित अवतार चित्रपटाची पुढची कथा दाखवण्यात येणार आहे.

ॲनिमेशन फिल्म ‘अवतार 2’ ने चित्रपटगृहात येण्यापूर्वीच अनेक कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट येत्या 16 डिसेंबरला प्रेशकांच्या भेटीस येणार आहे. 2009 साली प्रदर्शित झालेला ‘अवतार’ त्यावेळी प्रेक्षकांना खूप आवडला होता, आणि आता अवतार 2 म्हणजेच ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ मध्ये 2009 साली प्रकाशीत झालेल्या अवतार चित्रपटाची पुढची कथा दाखवण्यात येणार आहे.

PHOTO: चित्रपटगृहात येण्यापूर्वीच 'अवतार 2' ने केला करोडांचा गल्ला....तब्बल 13 वर्षांनंतर या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या सिक्वेलबाबतही प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या सिक्वेलने रिलीज होण्यापूर्वीच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता.

PHOTO: चित्रपटगृहात येण्यापूर्वीच 'अवतार 2' ने केला करोडांचा गल्ला....

एका अहवालानुसार, ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ हा चित्रपट रिलीज होण्याच्या दहा दिवस आधीचं भारतात 2 लाखांहून   अधिक तिकिटांची एडवांस बुकिंग झाली आहे. हा चित्रपट 16 डिसेंबर 2022 रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.

PHOTO: चित्रपटगृहात येण्यापूर्वीच 'अवतार 2' ने केला करोडांचा गल्ला.... ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ या  चित्रपटाची प्री-सेल गेल्या महिन्यात (नोव्हेंबर) मध्ये पंधरा दिवस अगोदर सुरू झाली होती, ज्यामध्ये 2.15 लाख रुपयांची 2.15 लाख तिकिटे विकली गेली होती.

PHOTO: चित्रपटगृहात येण्यापूर्वीच 'अवतार 2' ने केला करोडांचा गल्ला.... या चित्रपटाने एडवांस  तिकीट बुकिंगमधून 8.50 कोटी ($ 1 दशलक्ष) कमावले आहेत, त्यापैकी 3.50 कोटींची कमाई ही पहिल्याच दिवशी झालेली आहे, तर उर्वरित कमाई शनिवार आणि रविवारच्या तिकीट बुकिंगमधून झालेली आहे.

हे सुद्धा वाचा

VIDEO : अंगठ्याला दुखापत झालेली असतानाही रोहित शर्मा बॅटींगला उतरला

तुम्हाला कॉफी प्यायचे व्यसन लागले आहे का, काळजी करू नका हे आहेत उपाय

हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी बाजरीची भाकरी हा उत्तम पर्याय

PHOTO: चित्रपटगृहात येण्यापूर्वीच 'अवतार 2' ने केला करोडांचा गल्ला.... 2009 साली प्रदर्शित झालेला ‘अवतार’ हा चित्रपट सुमारे $237 दशलक्षच्या बजेटमध्ये तयार झाला होता आणि त्याने जगभरातुन तब्बल 20 हजार 368 कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते.

PHOTO: चित्रपटगृहात येण्यापूर्वीच 'अवतार 2' ने केला करोडांचा गल्ला....

आणि आता ‘अवतार 2’ हा चित्रपट तब्बल 250 दशलक्ष डॉलर्सच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. या चित्रपटाने   प्रकाशित होण्याच्या आगोदरच सोशल मीडियावरही चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे आता ‘अवतार 2’ हा   अवतार  पार्ट 1 चा रेकॉर्ड मोडतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!