30.4 C
Mumbai
Saturday, January 28, 2023
घरफोटो गॅलरीPHOTO: दिग्दर्शक रवी जाधव पुन्हा अडकले लग्नबंधनात, वाचा सविस्तर....

PHOTO: दिग्दर्शक रवी जाधव पुन्हा अडकले लग्नबंधनात, वाचा सविस्तर….

वयाच्या 51व्या वर्षी दिग्दर्शक रवी जाधवाने पत्नी सोबत बांधली पुन्हा लग्नगाठ.

मराठी सिनेसृष्टीतील टाइमपास, नटरंग, बालक-पालक, या गाजलेल्या चित्रपटांचा प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव याने पत्नी मेघना जाधव सोबत पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली आहे. 5 डिसेंबर 1998 मध्ये रवी आणि मेघना यांचं लग्न झालं होते, आणि आता लग्नाच्या 24 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने या दोघांनी पुन्हा एकदा सप्तवचन घेतले आहेत.

PHOTO: दिग्दर्शक रवी जाधव पुन्हा अडकले लग्नबंधनात, वाचा सविस्तर....नेहमीचं आपल्या चित्रपटांसाठी चर्चेत असलेला रवी जाधव सध्या एका फोटोमुळे चांगलाच चर्चेत आहे. या फोटोमध्ये रवी आणि मेघना हे वेडिंग लूकमध्ये असून सप्तपदी घेताना दिसत आहेत.

PHOTO: दिग्दर्शक रवी जाधव पुन्हा अडकले लग्नबंधनात, वाचा सविस्तर....

वायरल होणारा हा फोटो मेघना जाधवने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. आपल्या लग्नाच्या 24 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मेघनाने हा फोटो शेअर केला आहे.

PHOTO: दिग्दर्शक रवी जाधव पुन्हा अडकले लग्नबंधनात, वाचा सविस्तर....

फोटोला एक सुंदरस कॅप्शन सुद्धा मेघनानं दिलं आहे, “आमच्या लग्नाचा 24 वा वाढदिवस आहे. आम्ही 1992 मध्ये भेटलो आणि 1998 मध्ये लग्न केले. अनमोल क्षणांनी भरलेला हा प्रवास पुढे असाच चालू राहिल”

हे सुद्धा वाया

बिगबॉस फेम दिव्या अग्रवालची अपूर्व पाडगावकरसोबत एंगेजमेंट

अक्षय कुमारने शेअर केला छत्रपती शिवरायांच्या भुमिकेतील फर्स्ट लूक, पाहा खास झलक

PHOTO: अभिनेत्री हंसिका मोटवानी अडकली लग्नबंधनात.

PHOTO: दिग्दर्शक रवी जाधव पुन्हा अडकले लग्नबंधनात, वाचा सविस्तर....

मेघनाच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करुन शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री स्पृहा जोशी, हृता दुर्गुळे यांनी सुद्धा कमेंट करुन मेघना आणि रवी यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

PHOTO: दिग्दर्शक रवी जाधव पुन्हा अडकले लग्नबंधनात, वाचा सविस्तर....सध्या रवी त्याचा हिंदी चित्रपट ताली साठी सुद्धा चर्चेत आहे. या आगामी चित्रपटात बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचा पोस्टर प्रकाशित झाला असून प्रेक्षक चित्रपटाची देखील उत्सुकतेने वाट बघत आहेत.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!