26 C
Mumbai
Friday, December 8, 2023
घरफोटो गॅलरीPHOTO: प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात या विदेशी अभिनेत्री, जाणून घ्या कोण...

PHOTO: प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात या विदेशी अभिनेत्री, जाणून घ्या कोण…

बॉलीवूड त्याच्या आकर्षण, ग्लॅमर आणि स्टारडमुळे जगभरात प्रसिद्ध, अनेक परदेशी अभिनेत्री भारतीय चित्रपट उद्योगाकडे आकर्षित.

बॉलीवूड त्याच्या आकर्षण, ग्लॅमर आणि स्टारडमसाठी जगभरात प्रसिद्ध आहे, जे अनेक परदेशी अभिनेत्रींना भारतीय चित्रपट उद्योगाकडे आकर्षित करते. भारतीय फिल्म इंडस्ट्रीने सुद्धा नेहमीच विदेशी अभिनेत्रींचे खुलेआम स्वागत केले आहे. बॉलीवूड चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून उदरनिर्वाह करणाऱ्या अनेक अभिनेत्री आहेत. तर अशाच काही अभिनेत्रींबद्दल आज जानुन घेऊया……

कैटरीना कैफ

PHOTO: प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात या विदेशी अभिनेत्री, जाणून घ्या कोण...भारतीय चित्रपटसृष्टीतील सुंदर अभिनेत्री, कतरिना कैफ ही माजी मॉडेल आहे. तिने 2003 मध्ये बूम या हिंदी चित्रपटातुन बॉलीवूडमध्ये पदार्पण केले, परंतु नमस्ते लंडन द्वारे व्यावसायिक यशाची चव चाखली. कतरिना तेलगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये देखील दिसली आहे परंतु मुख्यतः हिंदी चित्रपट उद्योगात ती लोकप्रिय झाली.

नर्गिस फाखरी

PHOTO: प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात या विदेशी अभिनेत्री, जाणून घ्या कोण...

अमेरिकन फॅशन मॉडेल नर्गिस फाखरी हीने रॉकस्टार चित्रपटातुन बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिची जोडी रणबीर कपूर सोबत दिसुन आली. नर्गिसचा जन्म न्यूयॉर्कमध्ये झीला. तिचे वडील पाकिस्तानी तर आई झेक आहे, ती अमेरिकेच्या नेक्स्ट टॉप मॉडेल आणि 2009 मध्ये किंगफिशर स्विमसूट कॅलेंडरमध्ये सुद्धा दिसुन आली होती.

जॅकलिन फर्नांडिस

PHOTO: प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात या विदेशी अभिनेत्री, जाणून घ्या कोण...

बॉलीवूड चित्रपटांमध्ये दिसणारी मॉडेल आणि ब्युटी क्वीन अभिनेत्री जॅकलिन ही मुळची श्रीलंकन आहे. ती मिस श्रीलंका युनिव्हर्स सुद्धा राहीली आहे. जॅकलिनने रितेश देशमुख सोबत अलादिन या काल्पनिक चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. जॅकलीन तिच्या हाऊसफुलमधील ‘धन्नो’ या आयटम साँगमधून प्रसिद्ध झाली, त्यानंतर महेश भट्टच्या थ्रिलर मर्डर 2 मध्ये ती इमरान हाश्मी सोबत दिसुन आली.

अली लार्टर

PHOTO: प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात या विदेशी अभिनेत्री, जाणून घ्या कोण...अली लार्टर किंवा अलिसन एलिझाबेथ ही एक अमेरिकन अभिनेत्री आहे. तिने सलमान खान विरुद्ध मारीगोल्ड या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अलिसन एलिझाबेथ ही NBC मधील निकी सँडर्स आणि ट्रेसी स्ट्रॉस या तिच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध आहेत.

हे सुद्धा वाचा

Rishabh Pant Urvashi Rautela : पंत-उर्वशीच्या नात्याबाबत शुभमन गिलने केला मोठा खुलासा! म्हणाला,’त्याला फरक पडत नाही…’

Hemant Dhome: लोक चित्रपटाची तिकीटे काढले, मात्र शो कॅन्सल झाला; मराठमोळ्या दिग्दर्शकाची खंत

Shah Rukh Khan: किंग खान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये होणार सन्मानित

लिंडा आर्सेनियो

PHOTO: प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात या विदेशी अभिनेत्री, जाणून घ्या कोण...अमेरिकन अभिनेत्री लिंडा ही टेक्सासमधील एक मॉडेल आहे. जी तिच्या काबुल एक्सप्रेस (2006) या चित्रपटासाठी प्रसिद्ध आहे. लिंडा तमिळ आणि तेलगू भाषेतील अनेक भारतीय चित्रपटांमध्ये दिसली आहे, तिने तेलगू चित्रपटात काही आयटम नंबर देखील केले आहेत.

सनी लिओनी

PHOTO: प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात या विदेशी अभिनेत्री, जाणून घ्या कोण...सनी लिओनी ही कॅनेडियन अभिनेत्री आणि मॉडेल आहे. पूजा भट्ट दिग्दर्शित जिस्म 2 मधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सनी बिग बॉस या टेलिव्हिजन शोसाठी भारतात आली आणि तिला अनेक बॉलिवूड चित्रपटाची ऑफर मिळाली.

अॅलिस पॅटन

PHOTO: प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात या विदेशी अभिनेत्री, जाणून घ्या कोण...अॅलिस पॅटन ही एक इंग्लिश अभिनेत्री आहे जी आमिर खान विरुद्ध रंग दे बसंती या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने स्यू ही व्यक्तिरेखा साकारली जी राजकारणी ख्रिस पॅटन यांची मुलगी आहे, आणि ब्रिटीश राजवटीबद्दल माहितीपट बनवण्यासाठी भारतात आली होती.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी