22 C
Mumbai
Saturday, December 10, 2022
घरफोटो गॅलरीPHOTO : अभिनेत्री ते बिझनेस वुमन... असा आहे जुही चावलाचा प्रवास

PHOTO : अभिनेत्री ते बिझनेस वुमन… असा आहे जुही चावलाचा प्रवास

सर्व प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री जुही चावला 13 नोव्हेंबरला तिचा 55 वा वाढदिवस साजरा करत आहे.

90 च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्रींच्या यादीत जुही चावलाचे नाव नेहमी आघाडीवर येते. शाहरुख खान, आमिर खान, ऋषी कपूर आणि अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत काम करणाऱ्या जुही चावलाने आपल्या अभिनयाच्या आणि सुंदरतेच्या जोरावर सर्व प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री जुही चावला 13 नोव्हेंबरला तिचा 55 वा वाढदिवस साजरा करत आहे. आज आपण तिच्या करिअरबद्दल जाणून घेऊया….PHOTO : अभिनेत्री ते बिझनेस वुमन... असा आहे जुही चावलाचा प्रवासजूही चावलाने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. तिने चित्रपटात येण्यापूर्वी 1984 मध्ये मिस इंडियाचा किताब पटकावला होता.

PHOTO : अभिनेत्री ते बिझनेस वुमन... असा आहे जुही चावलाचा प्रवास

त्याचवेळी जुहीने 1986 मध्ये ‘सलतनत’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात केली. जुही चावलाचा हा चित्रपट फ्लॉप ठरला. यानंतर जुही दक्षिण चित्रपट सृष्टीकडे वळली. साऊथचे काही चित्रपट केल्यानंतर जुही पुन्हा बॉलिवूडमध्ये आली.

PHOTO : अभिनेत्री ते बिझनेस वुमन... असा आहे जुही चावलाचा प्रवास

हे सुद्धा वाचा

PHOTO : सिनेमांपेक्षा इंस्टाग्रामवरून जास्त पैसे कमावते जान्हवी कपूर, वाचा गणित

Mumbai News : मुंबईत पाळीव कुत्रे फिरवणाऱ्यांनी सावधान !

Vivek Agnihotri : विवेक अग्निहोत्रीचा आगामी चित्रपट ‘द व्हॅक्सिन वॉर’ 15 ऑगस्ट रोजी होणार प्रदर्शित

1988 मध्ये आलेला ‘कयामत से कयामत तक’ हा चित्रपट जुही चावलाच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. या चित्रपटातील जुही चावलाच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले, तर याच चित्रपटाने जुहीला रातोरात स्टार बनवले.

PHOTO : अभिनेत्री ते बिझनेस वुमन... असा आहे जुही चावलाचा प्रवास

‘आयना’, ‘हम हैं राही प्यार के’ आणि ‘डर’ हे चित्रपट जुही चावलाच्या करिअरमधील सर्वोत्तम चित्रपट मानले जातात.

PHOTO : अभिनेत्री ते बिझनेस वुमन... असा आहे जुही चावलाचा प्रवास

जुही चावलाने शाहरुख खान, जॅकी श्रॉफ, ऋषी कपूर आणि अशा अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केले असले तरी आमिर खानसोबतची तिची जोडी प्रेक्षकांना सर्वाधिक आवडली होती.

PHOTO : अभिनेत्री ते बिझनेस वुमन... असा आहे जुही चावलाचा प्रवास

1995 मध्ये जुहीने उद्योगपती जय मेहतासोबत लग्न केले. पतीच्या जास्त वयामुळे जुहीला अनेक वेळा ट्रोल ही करण्यात आले आहे. परंतु जुहीने हे सिद्ध केले आहे की एकमेकांवर जर प्रेम असेल आणि दोघांमध्ये ती समज असेल तर दोन व्यक्तींंमध्ये असलेल्या वयाने काहीही फरक पडत नाही.

PHOTO : अभिनेत्री ते बिझनेस वुमन... असा आहे जुही चावलाचा प्रवास

90 च्या दशकात चित्रपटांमध्ये हिट असणारी जुही अभिनेत्री असण्यासोबतच एक बिझनेस वुमन देखील आहे. जुहीला  जान्हवी आणि अर्जुन अशी दोन मुले आहेत. सर्वांना आवडणारी ही अभिनेत्री रविवारी 13 नोव्हेंबरला तिचा 55 वा वाढदिवस साजरा करत आहे.

 


 

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!