31 C
Mumbai
Wednesday, February 1, 2023
घरफोटो गॅलरीPHOTO: ‘या’ गोष्टीत शरद पवार यांचा कोणीच हात धरु शकत नाही!

PHOTO: ‘या’ गोष्टीत शरद पवार यांचा कोणीच हात धरु शकत नाही!

५० वर्षे शरद पवार देशाच्या राजकारणात आणि समाजकारणात अविरत काम करत आहेत.

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा ८२ वा वाढदिवस साजरा होत आहे. गेली ५० वर्षे शरद पवार देशाच्या राजकारणात आणि समाजकारणात अविरत काम करत आहेत. शरद पवार यांच्या कामाचा झपाटा पाहता लोक स्तिमीत होऊन जातात. त्यांचे विविध क्षेत्रातील ज्ञान आणि व्यक्तिमत्त्वाचे पैलू आपण थोडक्यात जाणून घेऊया…

अफाट जनसंपर्क

PHOTO: ‘या’ गोष्टीत शरद पवार यांचा कोणीच हात धरु शकत नाही!

शरद पवार यांचा जनसंपर्क अफाट आहे. अगदी खेडे गावातल्या एखाद्या शेतकऱ्या पासून ते देश परदेशातील उद्योगपतींशी शरद पवार यांचा थेट संपर्क असतो. शरद पवार यांच्या यशस्वी राजकारणातील हा गुण देखील खुप वैशिष्ट्यपूर्ण आहे.

चतुरस्र बुध्दीमत्ता

PHOTO: ‘या’ गोष्टीत शरद पवार यांचा कोणीच हात धरु शकत नाही!

शरद पवार केवळ राजकारणातच नव्हे तर इतर अनेक क्षेत्रातील त्यांचे ज्ञान अफाट हे पवारांचे वैशिष्ट्य आहे साहित्यापासून खेळापर्यंत कोणतेही क्षेत्र म्हणा त्या क्षेत्रातील त्यांचे ज्ञान पाहून समोरचा माणूस अवाक होतो.

प्रचंड स्मरण शक्ति

PHOTO: ‘या’ गोष्टीत शरद पवार यांचा कोणीच हात धरु शकत नाही!

शरद पवार यांच्या स्मरणशक्तीबाबत अनेक किस्से सांगितले जातात. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला ते कितीही वर्षे झाली तरी अगदी नावाने ते त्या व्यक्तीला हाक मारुन संवाद साधतात.

उत्कृष्ट प्रशासन

PHOTO: ‘या’ गोष्टीत शरद पवार यांचा कोणीच हात धरु शकत नाही!

ज्या नेत्याला प्रशासन समजले तोच नेता विकासाची गंगा सर्वसामान्यांपर्यंत घेऊन जाण्यात यशस्वी होतो. पवार यांचा प्रशासनावरचा असलेला वचक अनेकदा त्यांच्या निर्णयांमधून दिसून आला आहे. लोकाभिमूख कामे करताना त्यांनी अनेकदा येणाऱ्या प्रशासकीय अडचणींवर चुटकीसरशी तोडगा काढल्याचे अनेक किस्से देखील अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळता.

उद्योग

PHOTO: ‘या’ गोष्टीत शरद पवार यांचा कोणीच हात धरु शकत नाही!

देशाला, राज्याला पुढे न्याचचे असेल तर उद्योगधंदे वाढले पाहिजेत यासाठी शरद पवार नेहमीच आग्रही राहिले आहेत. वाहन कृषी प्रक्रियेवर आधारीत उद्योग, साखर उद्योग ते ऑटोमोबाईल ते अगदी आयटी इंटस्ट्रीपर्यंत शरद पवार यांनी अनेक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे.

शेती 

PHOTO: ‘या’ गोष्टीत शरद पवार यांचा कोणीच हात धरु शकत नाही!

शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदापासून केंद्रात संरक्षण मंत्रीपदापर्यंत अनेक मंत्रीपदावर काम केले. ते देशाचे कृषी मंत्री देखील होते. पण त्यांच्या सर्वाधिक जिव्हाळ्याचा विषय म्हणजे शेती. शेतीसंबंधतीत अनेक प्रश्नांवर त्यांनी काम केले. अवकाळ असो अथवा दुष्काळ शेतकऱ्यांच्या बांधावर पहिल्यांदा जाणारा नेता अशी त्यांची ख्याती आहे.

पाणी

PHOTO: ‘या’ गोष्टीत शरद पवार यांचा कोणीच हात धरु शकत नाही! जल व्यवस्थापनाबाबत देखील शरद पवार यांचा प्रचंड अभ्यास असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. पाझर तलावापासून उपसा सिंचन, धरणे, कालवे इतकेच काय अगदी विहिरी, बारवांपर्यंत त्यांचा प्रचंड अभ्यास अनेकदा दिसून आला आहे.

हे सुद्धा वाचा

साताऱ्यातील मंत्र्याचा गावभर बोभाटा; वाढदिवसाच्या वसुलीसाठी अधिकाऱ्यांना फतवा

साताऱ्यातील मंत्र्याचा गावभर बोभाटा; वाढदिवसाच्या वसुलीसाठी अधिकाऱ्यांना फतवा

माझ्या विचारांचा सरपंच निवडून न आल्यास निधी देणार नाही; नितेश राणे म्हणाले याला धमकी समजा किंवा काहीही…

क्रिडा

PHOTO: ‘या’ गोष्टीत शरद पवार यांचा कोणीच हात धरु शकत नाही!

शरद पवार यांना खेळाडूंबद्दल देखील विशेष आपुलकी आहे. कबड्डी, कुस्ती ते अगदी क्रिकेट शरद पवार यांनी सर्वच क्रिडा क्षेत्रात अमूल्य असे योगदान दिले आहे. क्रिकेटमध्ये आयपीलए ते कबड्डीमध्ये प्रो कबड्डी सामने, खेळाडूंसाठी कॉपर फंड्स, कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष, बीसीसीआयचे अध्यक्ष, आयसीसीचे अध्यक्ष अशा अनेक पदांवर देखील शरद पावर यांनी काम केले आणि क्रिडा क्षेत्राला नाव लौकीक मिळवून दिला.

शिक्षण

PHOTO: ‘या’ गोष्टीत शरद पवार यांचा कोणीच हात धरु शकत नाही!शिक्षण क्षेत्रात देखील पवार यांचे अतिशय अमुल्य योगदान राहिले आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेचा वाढवलेला वटवृक्ष त्यांनी जपला. इतकेच नव्हे तर आधूनिक युगात कौशल्य आधारीत शिक्षणासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे.

 

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!