मराठीसह हिंदी, इंग्रजी, मल्याळम चित्रपटसृष्टीत अभिनय करणारी मराठमोळी अभिनेत्री नेहा महाजन (Neha Mahajan) हिचा गडद अंधार (gadad andhar) हा थ्रीलरपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
गडद अंधार या चित्रपटातील गाणे आणि ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
गडद अंधार या चित्रपटातून पाण्याखालचे विश्व प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.
नेहा महाजनने मराठीत अनेक चांगले चित्रपट दिले असून निळकंठ मास्तर, कॉफी आणि बरेच काही या चित्रपटांना मराठी प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता.
तर पेंटेड हाऊस य़ा दाक्षिणात्य चित्रपाटातील तिच्या भूमिकेचे सिनेसमिक्षकांनी कौतुक केले होते.
बॉलीवूडमध्ये देखील ती काम करते. सिंबा या हिंदी चित्रपटात देखील तीने अभिनय केला होता. त्याची देखील चर्चा झाली होती.
आता तिचा गडद अंधार हा पाण्याखाचे विश्व उलगडून दाखविणारा थ्रीलर चित्रपट ३ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
View this post on Instagram