मोचा चक्रीवादळ रविवारी म्यानमार आणि आग्नेय बांगलादेशामध्ये जाऊन धडकले. आधीच विस्तीर्ण निर्वासित छावण्या असलेल्या पश्चिम म्यानमारच्या काही भागात वादळाचा तडाखा अतिशय विनाशक ठरत आहे. दळणवळण मोठ्या प्रमाणावर खंडित झाले आहे.
बांग्लादेशातील कॉक्स बाजार आणि म्यानमारच्या सिटवे दरम्यान मोचा वादळ 195 किमी प्रतितास (120mph) वेगाने आगेकूच करीत आहे. बंगालच्या उपसागरातील अलीकडील दशकात हे सर्वात शक्तिशाली वादळ आहे.

म्यानमारमधील क्यूकताव येथे मोचा चक्रीवादळ धडकले. त्यात किनाऱ्यावरील अनेक घरांचे नुकसान झाले. वादळ ओसारल्यावर स्थानिक रहिवासी नुकसानीचा अंदाज घेत आहेत. मोचा चक्रीवादळ 14 मे रोजी म्यानमार आणि आग्नेय बांगलादेशात किनाऱ्यावर धडकले. सभोवती अनेक झाडे उन्मळून पडली. रोहिंग्या विस्थापित छावण्यांमधील घरेही कोसळली. सखल भागात वादळाने जास नुकसान झाले.

म्यानमारच्या राखीन राज्यातील क्यौकटॉमध्ये चक्रीवादळाने उन्मळून पडलेल्या झाडांमधून वाट शोधताना स्थानिक रहिवाशी. रस्त्यावर झाडे पडल्याने दळणवळण मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाले. हवामानाचा उत्तम अंदाज आणि अधिक प्रभावी निर्वासन नियोजनामुळे अशा चक्रीवादळांमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या आता लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.

चक्रीवादळ तडाखा देऊन निघून गेले आहे. भारतीय हवामान खात्याने हे वादळ आता म्यानमारच्या अंतर्गत भागातील खडबडीत टेकड्यांवर आदळल्याने कमकुवत होईल, असा अंदाज वर्तविला आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त टेकनाफमध्ये चक्रीवादळ ओसरल्यानंतर रेड क्रेसेंट सोसायटीने मदत साहित्य वाटपास सुरुवात केली आहे.

चक्रीवादळाने कॉक्स बझारमध्ये जवळपास 10 लाख रोहिंग्या निर्वासितांच्या छावण्यांमध्ये सुमारे 400-500 तात्पुरत्या आश्रयस्थानांचे नुकसान झाले होते; परंतु जीवितहानी झाल्याचे कोणतेही वृत्त नाही. बांगलादेशातील टेकनाफमध्ये रस्त्यावर पडलेली झाडे आणि इतर अडथळे दूर करण्यासाठी स्वयंसेवक धावून आले आहेत. चक्रीवादळामुळे बांगलादेशमध्ये कोणतीही मोठी हानी झाली नाही. चक्रीवादळापूर्वीच 7,50,000 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले गेले होते. काही घरांचे मात्र वादळात मोठे नुकसान झाले आहे.
VIDEO : मोचा चक्रीवादळाची थरारक दृश्यं… (क्रेडिट : बीबीसी)

चक्रीवादळामुळे सिटवे या बंदर शहराशी असलेला संपर्क मोठ्या प्रमाणात खंडित झाला होता. सुमारे 1,50,000 लोकसंख्येच्या शहरातील रस्त्यांचे नद्यांमध्ये रूपांतर झाले. वादळ किनाऱ्यावर धडकले आणि अनेक इमारतींवरील छप्पर उडवले, वीज तारा खाली पडल्या.

म्यानमारच्या राखीन राज्यातील क्युकफ्यू येथे विस्थापित रोहिंग्यांच्या छावणीत ताडपत्री आणि बांबूपासून बनवलेली घरे वाऱ्याने उध्वस्त केली. जर समुद्राचे पाणी वाढले तर छावणीत पूर येऊ शकतो. अनेकांनी गेले दोन दिवस क्यूकटॉमध्ये निवाऱ्यात रात्र घालवली होती.

हजारो लोकांनी शनिवारी सिटवे सोडले, ट्रक, कार आणि टुक-टुकमध्ये भरून आणि उंचावरील डोंगर खोऱ्याकडे ते निघाले. हवामान खात्याने 11 फूटपर्यंत वादळाचा इशारा दिला होता. आता या निर्वासितांना अन्न मदत मिळण्याची प्रतीक्षा आहे.

पाच वर्षांपूर्वी म्यानमारमधील क्रूर लष्करी कारवाईनंतर पळून आलेल्या रोहिंग्या निर्वासितांना बांगलादेशने आता बंदी घातली आहे. रोहिंग्या निर्वासित म्यानमारमध्ये परतण्याऐवजी कायमस्वरूपी बांगलादेशात स्थायिक होण्याची सरकारला भीती आहे.
हे सुद्धा पाहा / वाचा :
श्वेता तिवारीचे फोटो पाहून चाहते झाले घायाळ; म्हणाले मुलीपेक्षा तूच सुंदर
मुंबईच्या रस्त्यांवर धावली देशातील पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर एसी बस
रिंकू राजगुरु म्हणते; तुमचे हृदय सांगेल त्यावरच विश्वास ठेवा!

छावण्या सामान्यतः किंचित आतल्या बागायत असतात; परंतु त्यापैकी बहुतेक डोंगरावर बांधलेले असतात, ज्यामुळे त्यांना भूस्खलनाचा धोका असतो.
