29 C
Mumbai
Thursday, August 3, 2023
घरफोटो गॅलरीशिंदे सेनेचे कार्यकर्ते विशेष रेल्वेने अयोध्येला रवाना

शिंदे सेनेचे कार्यकर्ते विशेष रेल्वेने अयोध्येला रवाना

एकनाथ शिंदे यांनी दाखवला हिरवा झेंडा; शिंदे म्हणाले, अयोध्या हा आमच्यासाठी राजकारणाचा नसून आस्थेचा विषय. धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर प्रभू श्रीरामाचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सारे अयोध्येला जात आहोत.

शिंदे सेनेचे कार्यकर्ते विशेष रेल्वेने अयोध्येला रवाना झाले आहेत. शिंदे सेना कार्यकर्त्यांना घेऊन अयोध्येकडे निघालेल्या विशेष ट्रेनला एकनाथ शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी शिंदे म्हणाले, अयोध्या हा आमच्यासाठी राजकारणाचा नसून आस्थेचा विषय. धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर प्रभू श्रीरामाचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सारे अयोध्येला जात आहोत.

Eknath Shinde flagged off Shinde Sena Ayodhya Tour श्रीरामचंद्राच्या आशीर्वादाने आम्हाला धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर प्रभू श्रीरामाचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सारे अयोध्येला जात आहोत. अयोध्येच्या दिशेने निघालेल्या तमाम शिवसैनिकांची आस्थापूर्वक चौकशी करून त्यांना अयोध्येकडे रवाना केले, असे एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या @mieknathshinde या अधिकृत अकाऊंटवर ट्विट करून म्हटले आहे. 

Chalo Ayodhya Ayodhya by special train Shinde Sena Ayodhya Tour

जय भवानी जय शिवाजी, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो,जय श्रीराम असा जयघोष करत असंख्य शिवसैनिक आज एका विशेष रेल्वेने अयोध्येकडे रवाना झाले. या रेल्वेला भगवा झेंडा दाखवून शिवसैनिक सहकाऱ्यांना प्रवासाकरिता शुभेच्छा दिल्या, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. (फोटो सौजन्य : @mieknathshinde)

 bow and arrow election symbol Shinde Sena Ayodhya Tour

अयोध्या हा आमच्यासाठी राजकारणाचा नसून आस्थेचा विषय आहे. अयोध्येत भव्य राम मंदिर उभारले जावे ही वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती,आणि त्यांचे हे स्वप्न पूर्ण होत असल्याने याचि देही याचि डोळा हे मंदिर निर्माण कार्य पाहण्यासाठी तिथे जात आहोत. (फोटो सौजन्य : @mieknathshinde)

Ayodhya not politics matter Shinde Sena Ayodhya Tour

रामलल्ला चे दर्शन घेण्यासाठी मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री, आमदार, खासदार तसेच पक्षातील पदाधिकाऱ्यांना घेऊन अयोध्येकडे रवाना होत असल्याचे यावेळी सांगितले. (फोटो सौजन्य : @mieknathshinde)

हे सुद्धा वाचा : 

अयोध्येतील राम मंदिर उभारणीत महाराष्ट्राचे देखील योगदान!

श्रीराम नवमी 2023: श्रीराम जन्मोत्सवाच्या या खास गोष्टी जाणून घ्या..

अयोध्येच्या जनतेचे ठाकरे कुटुंबावर प्रेम आहे : संजय राऊत

अयोध्या निकाल ऐकायला बाळासाहेब असायला हवे होते : राज ठाकरे

 

सुधीर मूनगुंटीवार श्रीरामजी यांच्या मंदिर उभारणीला समर्पित लाकडी पूजन कार्यक्रमात चंद्रपूरच्या मुस्लिम बांधवांनीही उत्साहाने सहभाग घेतला

अयोध्यापती मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामजी यांच्या मंदिर उभारणीला समर्पित लाकडी पूजन कार्यक्रमात चंद्रपूरच्या मुस्लिम बांधवांनीही उत्साहाने सहभाग घेतला आणि जय श्रीरामच्या घोषणा देत शोभयायात्रेत सहभाग घेतला.
(फोटो सौजन्य : @SMungantiwar)

Shinde Sena Karyakarta left for Ayodhya, Eknath Shinde flagged off, Ayodhya by special train, Ayodhya not politics matter, bow and arrow election symbol

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी