29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीयपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा अपमान करणे दुर्दैवी ,सुप्रिया सुळे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा अपमान करणे दुर्दैवी ,सुप्रिया सुळे

टीम लय भारी

नवी दिल्ली:- महाराष्ट्रालाबद्दल पंतप्रधान मोदी असं का बोलले? याचं वाईटत वाटतंय. आपल्याला वेदना झाल्या. पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राचा उल्लेख कोविड सुपर स्प्रेडर म्हणून केला. हे धक्कादायक आहे. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. मोदी हे भाजपचे नाही, तर देशाचे पंतप्रधान आहेत.(PM Narendra Modi insulted Maharashtra  Supriya Sule)

 पण करोना कुणी पसवरला याचं आत्मचिंतन केलं पाहिजे. पंतप्रधान मोदींवर आम्ही नाराज नाही, पण हैराण आहोत. आमच्या महाराष्ट्राबद्दल तुम्ही असं का बोलले? राज्यांमध्ये द्वेष का पसरवताय? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत केला.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी डीआरडीओची उडवली खिल्ली

बाप-लेकीचं नातंच वेगळं! बाबांच्या मदतीसाठी धावल्या सुप्रिया सुळे…

सुप्रिया सुळेंना कोरोनाची लागण, पती सदानंद सुळे ही पॉझिटिव्ह

NCP MP Supriya Sule mocks DRDO; makes false claims about vaccines in Parliament: Details

पंतप्रधान हे केवळ कोणा एका पक्षाचे नसतात. ते केवळ भाजपचे नाहीत. ते संपूर्ण देशाचे असतात. असे असताना एखाद्या राज्याबद्दल पंतप्रधानांनी असे वक्तव्य करणे अत्यंत दुर्दैवी आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राने भाजपला 18 खासदार दिले आहेत. या सर्व खासदार आणि महाराष्ट्रातील जनतेचा, मतदारांचा अपमान आहे, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

महाराष्ट्र सरकारवर कोरोना पसरवणारे राज्य म्हणून आरोप करताना केंद्र सरकारने किमान डेटा तरी तपासायला हवा होता. महाराष्ट्र एसटी, टेम्पो, ट्रक अशी रस्ते वाहतूक पुरवू शकतो. कोरोना काळात सर्वधिक करोनाच्या पहिल्या लाटेत सर्वाधिक श्रमिक ट्रेन्स या गुजरातमधून धावल्या. महाराष्ट्रातूनही श्रमिक ट्रेन्स चालवल्या गेल्या. श्रमिक ट्रेन्स महाराष्ट्राने नाही, तर केंद्राने सोडल्या. रेल्वे केंद्र सरकारच्या आखत्यारित येते. ट्रेन्सचा निर्णय केंद्र सरकार घेतं. आमच्याकडे रेल्वे नाही. आमच्याकडे एसटी आहे. यामुळे पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रबद्दल असं वक्तव्य केल्याने दुःख होतंय, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या ट्विटचा संदर्भ देत पंतप्रधान मोदींच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. पंतप्रधान मोदी जे काही बोलले ते दुर्दैवी आहे. त्यांच्या पक्षातील नेते काहीही पसरवत आहेत. श्रमिक ट्रेन्स सोडल्याबद्दल भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेचे आभार मानले होते. करोना संकटाच्या काळात प्रत्येक श्रमिकाला त्याच्या घरी पोहोचवण्याचे काम आम्ही केले, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. पंतप्रधान मोदींनी फक्त यूपी आणि पंजाबचेच का नाव घेतले? याचं विशेष वाटतं. पण या करोना संकटाच्या काळात आपण माणुसकी विसरलो? इतकी आपली पातळी घसरली? असा सवालही सुप्रिया सुळेंनी केला. सातत्याने महाराष्ट्राबद्दल द्वेष पसरवला जातोय. महाराष्ट्राच्या प्रकल्पांवर विकास योजनांवर अन्याय होतोय. पण महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापुढे कधीही झुकलेला नाही आणि झुकणारही नाही, असा इशाराही सुप्रिया सुळे यांनी दिला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी