28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीयधर्माच्या नावाखाली केवळ राजकारण! विवेकबुद्धीचा वापर सद्यस्थितीची गरज

धर्माच्या नावाखाली केवळ राजकारण! विवेकबुद्धीचा वापर सद्यस्थितीची गरज

टीम लय भारी

मुंबई : राजसत्ता आणि धर्मसत्तेत जेव्हा चढाओढ लागते तेव्हा नेहमी धर्मसत्ता वरचढ झालेली पाहायला मिळते. परंतु जेव्हा जेव्हा धर्मसत्ता वरचढ व्हायला लागते तेव्हा देशाची व समाजाची सर्वांगीण अधोगती ठरलेलीच असते. खरं तर जात धर्म किंवा उपासना हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय आहे, व्यक्तिगत निवड आहे परंतु सर्वसामान्य जनतेची फसवणूक आणि दिशाभूल करत धर्माच्या, जातीच्या नावाने राजकीय संघटन करत असल्याचे चित्र सध्या वारंवार पाहायला मिळत असल्याची खंत विकास लवांडे यानी व्यक्त केली.

यावर भाष्य करताना विकास लवांडे म्हणाले, संपूर्ण प्रकरणावर विचार केला असता काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेच्या असतात. सर्वप्रथम आपण सारेच भारतीय आहोत, मानवता धर्म हाच सगळ्या धर्माचा गाभा असून कोणताच धर्म हिंसाचार, द्वेष पसरवत नाही. परंतु आपल्या देशाची परिस्थिती अशी की जात, धर्म, वंश आणि कर्मकांड, अंधश्रद्धा यांना फार महत्त्व दिले जाते त्यामुळे विचारसरणी बुरसटलेलीच राहिली असून प्रगत राष्ट्रांच्या रांगेत बसण्याची स्वप्न तसेच राहिले आहे, असे म्हणून त्यांनी भारतीय विचारसरणीवर मत व्यक्त केले आहे.

लवांडे पुढे म्हणतात, स्वतःला सुशिक्षित व उच्चशिक्षित म्हणवणारे सर्वजण आता जागे झाले असले तरीही यासोबत जोड हवी स्वतंत्र विवेकी विचारांची. समाजभानासोबतच विवेकी विचारांची जोड असेल तर आपली व देशाची सर्वांगीण प्रगती सुकर होईल.

दरम्यान, विवेकी बुद्धीचा वापर हा राजकारण आणि धर्मकारणात कशा असायला हवे हे लवांडे अधोरेखीत करताना म्हणतात, केवळ राजकीय लोकांना दोष देऊन काहीही उपयोग नाही कारण कोणताच आमदार, खासदार, नगरसेवक, झेडपी सदस्य, सरपंच यापैकी कणताही लोकप्रतिनिधी समाजाने स्वतःहून निवडून दिलेला असतो. त्यामुळे लोकशाहीच्या या राज्यात ‘ मतपेटी ‘ हेच एकमेक आणि प्रभावी हत्यार आहे म्हणून आपल्याला चांगला बदल हवा असल्यास थोडं सक्रीय होणं, विवेकी विचार, आणि राजसत्ता – धर्मसत्तेतील अचूक ओळख याबाबत स्पष्ट भूमिका घेणे गरजेचे आहे.

या संपुर्ण बाबींकडे लक्ष वेधून घेत आपण नाही तर कोण ? आत्ता नाही तर कधी ? असा प्रश्न विचारून या महत्त्वपूर्ण विषयाकडे विकास लवांडे यांनी लक्ष वेधून घेतले आहे.

हे सुद्धा वाचा :

सांगली हत्याकांडाचा आज होणार संपुर्ण उलगडा, पोलिस करणार पर्दाफाश

रयत शिक्षण संस्थेत भरती; त्वरित अर्ज करा

राजन साळवींच्या उमेदवारीने बंडखोरांची ‘लाज’ चव्हाट्यावर येणार !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी