राजकीय

भाजपाच्या पोलखोल अभियान रथ यात्रेत प्रसाद लाड यांचे आघाडी सरकारवर टीकास्त्र

चेंबूर कॅम्प येथील भाजपा कार्यालयात विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते व आमदार प्रसाद लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत या अभियानाची सुरुवात झाली. मुंबई भाजपाच्या पुढाकाराने सुरुवात करण्यात आलेल्या पोलखोल अभियानाचा हा रथ, मुंबईतील वाड्यावस्त्यांवर तसेच प्रत्येक गल्लीत जाऊन मुंबई महापालिकेच्या कामकाजात झालेला भ्रष्टाचार, व्हिडीओ स्वरूपात दाखवला.

टीम लय भारी 

मुंबई : भाजपाच्यावतीने महाविकास आघाडी सरकार व मुंबई महापालिकेतील भ्रष्ट कारभाराची पोलखोल करण्यासाठी पोलखोल अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे.चेंबूर कॅम्प येथील भाजपा कार्यालयात विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते व आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्या प्रमुख उपस्थितीत या अभियानाची सुरुवात झाली. मुंबई भाजपाच्या पुढाकाराने सुरुवात करण्यात आलेल्या पोलखोल अभियानाचा हा रथ, मुंबईतील वाड्यावस्त्यांवर तसेच प्रत्येक गल्लीत जाऊन मुंबई महापालिकेच्या कामकाजात झालेला भ्रष्टाचार, व्हिडीओ स्वरूपात दाखवला.(Prasad Lad criticizes Mahavikas Aghadi)

भाजपाच्या पोलखोल अभियान रथ यात्रेत प्रसाद लाड यांचे आघाडी सरकारवर टीकास्त्र

विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार प्रसाद लाड आणि भाजपच्या संबंधित इतर नेत्यांनी यावेळी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रथाचे वाहन फोडणाऱ्या अज्ञात व्यक्तीबद्दल रीतसर तक्रार दाखल केली आहे.यावेळी आमदार प्रसाद लाड म्हणाले, “मुंबई महापालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणाऱ्या मुंबई भाजपच्या ‘पोलखोल अभियान’ रथावर रात्रीच्या काळोखात भ्याड हल्ला करण्यात आला. महाविकास आघाडीकडे द्यायला उत्तर नसल्यानेचं, भाजपाच्या रथ अभियानावर असे भ्याड हल्ले केले जात आहेत.” यावेळी आमदार लाड यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना देखील आव्हान दिले आहे. अपशब्द फक्त तुम्हालाच बोलता येतात का? आम्ही पण परळ लालबागमध्ये मोठी झालेली पोरं आहोत, आम्हाला देखील अपशब्द बोलता येतात, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

तत्पूर्वी काल रात्री अज्ञात इसमाने त्या रथाचे (वाहनाचे) नुकसान केल्याचे दिसून आले.महाविकास आघाडी सरकारने केलेल्या विविध गैरव्यवहाराबाबत पोलखोल अभियान रथ यात्रेची सुरुवात होणार होती. परंतु अज्ञात व्यक्तीने रथाच्या समोरच्या बाजूस इजा केल्यामुळे वाहनाचे नुकसान झाले आहे. हा हल्ला नेमका कोणी केला? याबाबत शंका निर्माण होत आहे. परंतु हा हल्ला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सांगितले.

 

कोविड काळात झालेला भ्रष्टाचार तसेच महापालिकेतील भ्रष्ट कारभार चेंबूरमध्ये नाक्या नाक्यावर दाखवला गेला पाहिजे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं भाषण मुंबईकरांनी पाहिलं पाहिजे, आघाडी सरकारची पोलखोल झालीच पाहिजे, असे मत यावेळी आमदार प्रसाद लाड यांनी व्यक्त केले!


हे सुद्धा वाचा : 

‘जयेशभाई जोरदार’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; रणवीर सिंह प्रमुख भूमिकेत

‘सोयीनुसार आणि सुपारीनुसार पोकळ हिंदुत्व’ राज ठाकरेंच्या व्यंगचित्राची पुण्यात बॅनरबाजी

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार शिगेला पोहचला आहे : प्रवीण दरेकर

‘Pol Khol’ campaign vehicle vandalised at Chembur; BJP blames Shiv Sena

 

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close