30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रघोटाळ्यांचा पर्दाफाश केल्यावर नोटीसा पाठवणार असाल तर... प्रवीण दरेकरांचा राज्य सरकारला इशारा

घोटाळ्यांचा पर्दाफाश केल्यावर नोटीसा पाठवणार असाल तर… प्रवीण दरेकरांचा राज्य सरकारला इशारा

फोन टॅपिंग प्रकरणी 12 मार्चला देवेंद्र फडणवीस यांना नोटीस पाठवण्यात आली. त्यांना आज रविवारी 13 मार्चला 11 वाजता चौकशीसाठी बीकेसी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले आहे. याबाबत सर्वच भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले असून,त्यांनी मविआ सरकारचा निषेध केला आहे. याबाबत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी “घोटाळ्यांचा पर्दाफाश केल्यावर नोटीसा पाठवणार असाल तर, या महाराष्ट्रामध्ये हे सहन केले जाणार नाही, असा इशारा त्यांनी मविआ सरकारला दिला आहे.

“देवेंद्र फडणवीस हे आमचे महाराष्ट्रातील सर्वोच्च नेते आहेत याशिवाय आमचे शक्तीस्थान आहेत. आमच्या शक्तीस्थानावर कोण आघात करण्याचा प्रयत्न करत असेल तसेच, सूड भावनेने छळवाद मांडत असेल तर भाजपाचा कार्यकर्ता सहन करणार नाही. काल 12 मार्चला केवळ नोटीस पाठवली. फडणवीस यांचे राजकारण त्यांची प्रतिमा महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे आणि जर त्याठिकाणी घोटाळ्यांचा पर्दाफाश करतो,म्हणून नोटीसा पाठवणार असाल तर, या महाराष्ट्रामध्ये हे सहन केले जात नाही. त्याच प्रत्यंतर काल बीकेसीला बोलावण्यात आल्यानंतर जो उद्रेक जनमाणसात झालेला पाहिला मिळाला. त्यामुळे राज्य सरकारने शहाणपणाची भूमिका घेतली आहे. याचा जबाब जो काही नोंदवायचा असेल तो रीतसर याठिकाणी नोंदवतील. देवेंद्र फडणवीससुद्धा एक निष्णात वकील आहेत. राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. गृहखात्याचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केलेले आहे. त्यामुळे कायद्याला कसा प्रतिसाद द्यावा याचे नीट भान आणि आकलन त्यांना असल्याकारणाने योग्य ते उत्तर फडणवीस देतील. परंतु, सरकारने जर याठिकाणी केवळ देवेंद्र पर्दाफाश करत आहेत आणि तुमचं षडयंत्र उघड करत आहेत म्हणून आमच्या शक्तीस्थानाला हात लावण्याचा प्रयत्न केलात तर, भाजपचा कार्यकर्ता सहन करणार नाही.  त्यामुळे परिणामांना सामोर जात या सरकारला त्याची किंमत मोजावी लागेल, असे आक्रमक वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केले आहे.

फडणवीस यांना पाठवलेल्या नोटीस प्रकरणात राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, पोलिसांचे पथक फडणवीसांचा जबाब नोंदवण्यासाठी सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. या नोटीस बाबतची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट्व्दारे दिली होती. या प्रकरणातून नक्की काय निष्पण्ण होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी