महाराष्ट्रमुंबईराजकीय

राणा दांम्पत्याच्या प्रकरणावरून न्यायालयाचे निरीक्षण म्हणजे ठाकरे सरकारला मिळालेली चपराक – प्रविण दरेकर

नवनीत राणा दांम्पत्याच्या जामिनाच्या निकालावरून सत्र न्यायालयाने नोंदविलेले निरिक्षण म्हणजे राज्यातील ठाकरे सरकारला त्यांच्या मनमानी कारभारावरुन पुन्हा एकदा दिलेली चपराक असल्याची प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर (Praveen Darekar) यांनी दिली. (Praveen Darekar's target on state government)

टीम लय भारी

मुंबई :नवनीत राणा दांम्पत्याच्या जामिनाच्या निकालावरून सत्र न्यायालयाने नोंदविलेले निरिक्षण म्हणजे राज्यातील ठाकरे सरकारला त्यांच्या मनमानी कारभारावरुन पुन्हा एकदा दिलेली चपराक असल्याची प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर (Praveen Darekar) यांनी दिली. (Praveen Darekar’s target on state government)

राणा दांम्पत्याच्या प्रकरणावरून न्यायालयाचे निरीक्षण म्हणजे ठाकरे सरकारला मिळालेली चपराक - प्रविण दरेकर

न्यायालयाने आपल्या निरिक्षणात अतिशय स्पष्ट केले आहे की, पोलिसांनी नोटीस दिल्यानंतरही राणा दांम्पत्य घराबाहेर पडले नाही. तसेच हनुमान चालिसाचे जे आवाहन त्यांनी केले होते ते पण त्यांनी मागे घेतले होते. त्यामुळे त्यांच्याविरुध्द आयपीसीचे कलम १२४ ए अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणे चुकीचे आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकराचा मनमानी कारभार न्यायालयाच्या निरिक्षणामुळे माध्यमातून जनतेसमोर उघड झाला आहे. कारण महाविकास आघाडी सरकारकडून भाजपच्या नेत्यांवर व त्यांच्या विरोधकांवर गुन्हे दाखल केले जात आहे. परंतु प्रत्येकाला न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे, असे प्रविण दरेकर (Praveen Darekar) म्हणाले.

मग ते नारायण राणे, मोहित कंबोज, गणेश नाईक , अनिल बोंडे, बबनराव लोणीकर असतील व मी स्वत: असेन…सर्वांना न्यायालयाकडून न्याय मिळाला आहे. याचा अर्थ राज्य सरकारकडून चुकीच्या पध्दतीने गुन्हे दाखल केले जात आहेत. तरीही न्यायालयाच्या निकालानंतर न्यायालयाच्या भूमिकेवर सत्ताधा-यांकडून संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे अशा प्रकारे सरकारच्या माध्यमातून बेधुंदशाही सुरु असल्याचा आरोप विधानपरिषेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर (Praveen Darekar) यांनी केला.

राणा दांम्पत्य यांचा रुग्णालयातील व्हिडीओतील चित्रण अतिशय हृदय पिळवटणारे आहे. एक दलित महिला व खासदार असलेल्या महिलेचा छळवाद जो मांडला आहे. पोलिसांनी त्यांना नाहक गेले १२ दिवस जेलमध्ये टाकले होते, त्यांच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा होत नाही, हे न्यायालयाच्या निरिक्षणावरुन स्पष्ट होत आहे. त्या आजारी आहेत, त्यांची प्रकृतीही खालावली आहे, हे राज्य सरकारला शोभणारे नाही. यामुळे महाविकास आघाडी सरकारची प्रतिमाही जनतेच्या मनामध्ये मलिन झाली आहे अशी टिकाही दरेकर (Praveen Darekar) यांनी केली.

संजय राऊत यांनी केंद्राच्या कारभारावर केलेल्या आरोपाला उत्तर देताना प्रविण दरेकर यांनी सांगितले की, राऊत यांचे हे विधान ठाकरे सरकारच्या कारभारासाठी तंतोतंत लागू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा कारभार अतिशय उत्तमरित्या सुरु आहे. त्याची काळजी राऊत यांनी करु नय. सध्या राज्यामध्ये ब्रिटीशांप्रमाणे दडपशाहीचा कारभार सुरु आहे. सत्ताधारी पक्षातील नेते व पदाधिकारी यांनी बलात्कार केले, विनयभंग केले तरीही त्यांच्याविरोधात कारवाई होत नाही. त्यामुळे या सरकराचा जो मनमानी व अहंकारी कारभार सध्या राज्यात सुरु आहे तो ब्रिटिश राजवटीला साजेशा आहे, त्यामुळे तीच भूमिका राऊत यांनी मांडली असावी असा टोलाही दरेकर यांनी लगावला. (Praveen Darekar’s target on state government)


हे सुद्धा वाचा : 

महाविकास आघाडीमुळेच विजेचा खेळखंडोबा सुरु आहे : प्रवीण दरेकर

Mob Attacks BJP Activist’s Car Near Maharashtra CM’s Home

घोटाळ्यांचा पर्दाफाश केल्यावर नोटीसा पाठवणार असाल तर… प्रवीण दरेकरांचा राज्य सरकारला इशारा

पोलिसांच्या चौकशीला पूर्ण सहकार्य करणार पण राज्य सरकार या गोष्टीचा ‘पराचा कावळा’ करू पाहत आहे : प्रवीण दरेकर

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close