34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमनोरंजनप्रवीण तरडे पोहोचले थेट लंडनच्या भाजी मार्केटमध्ये

प्रवीण तरडे पोहोचले थेट लंडनच्या भाजी मार्केटमध्ये

टीम लय भारी

मराठीतील दिग्दर्शक, लेखक, अभिनेता प्रवीण तरडे (Actor Praveen Tarde) हे व्यवसायाने चित्रपट क्षेत्रात (Film Industory) काम करत असले तरी त्यांचे शेतीविषयी असणारे प्रेम सर्वांनाच माहित आहे. प्रवीण तरडे हे सध्या आपल्या पत्नीसोबत लंडन येथे फिरायला गेले आहेत. नुकतेच त्यांनी तिथे लायन किंग हे नाटक पाहिले. पण अभिमानाची गोष्ट म्हणजे हे नाटक पाहायला जाताना प्रवीण तरडे आणि त्यांच्या पत्नी स्नेहल तरडे हे दोघेही मराठमोळ्या वेशात गेले होते.

पण आता प्रवीण तरडे यांनी त्यांच्या फेसबुकला लंडनमधील आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी लंडनमधील वेस्टर्न इंटरनॅशनल भाजी मार्केटला भेट दिली आहे. या भाजी मार्केटला दोन महाराष्ट्रीयन व्यक्ती सांभाळत असून भारतातील अनेक भाज्यांची निर्यात येथे केली जाते. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होऊ शकतो, असेही प्रवीण तरडे या व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहेत.

लंडनमध्ये जाऊन लंडन आय किंवा टॉवर ब्रिज पाहण्यापेक्षा मराठी माणसांचे वर्चस्व असलेल्या भाजी मार्केटला प्रवीण तरडे यांनी भेट दिली. येथे भविष्याच्या दृष्टीने मराठी मुलांना शेतातील माल निर्यात करता येईल आणि याचा फायदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होईल. यामुळे शेतीपासून लांब पळणारी तरुणाई बाहेरगावी काम करता येईल किंवा आपल्या शेतातील माल परदेशात पोहोचवता येईल, यादृष्टीने काम करेल.

सध्या लंडनच्या या वेस्टर्न इंटरनॅशनल भाजी मार्केटमध्ये सचिन कदम आणि नीरज रत्तू नामक दोन व्यक्ती गेल्या २० वर्षांपासून भाजीचा व्यवसाय करत आहेत. दोन मराठी व्यक्तींनी उभ्या केलेल्या या साम्राज्यात करोडोंची उलाढाल होत असून एक महाराष्ट्रीयन म्हणून ही अभिमानाची बाब असल्याचे प्रवीण तरडे यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे.

भारतातूनच नव्हे तर वेगवेगळ्या देशातून या मार्केटमध्ये भाज्यांची आणि फळांची निर्यात केली जाते. भारतातून सुद्धा भेंडी, दुधी भोपळा, वांगी यांसारख्या अनेक भाज्यांची निर्यात करण्यात येते. प्रवीण तरडे यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ त्यांच्या Pravin Vitthal Tarde या फेसबुक अकाउंटला जाऊन पाहता येऊ शकतो.

हे सुद्धा वाचा :

एसटी बस दुर्घटना अपडेट, 12 जणांवर शोकाकूल वातावरणात आज होणार अंत्यसंस्कार

नक्की वाचा: ‘द्रौपदी टुडू मुर्मू’ यांची जीवन कहाणी

VIDEO : काय सांगता…? पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांचे फोटो फेकले कचऱ्यात

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी