29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमुंबईपोलिसांच्या चौकशीला पूर्ण सहकार्य करणार पण राज्य सरकार या गोष्टीचा 'पराचा कावळा'...

पोलिसांच्या चौकशीला पूर्ण सहकार्य करणार पण राज्य सरकार या गोष्टीचा ‘पराचा कावळा’ करू पाहत आहे : प्रवीण दरेकर

टीम लय भारी

मुंबई : बँकेच्या संचालकपदी प्रवीण दरेकर (pravin darekar) यांची मजूर म्हणून झालेली निवड अपात्र ठरवल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात प्रवीण दरेकर यांची मुंबई पोलीस चौकशी करणार आहेत. या चौकशीसाठी दरेकर माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. यावेळी पोलीस स्टेशनच्या बाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते दाखल झाले आहे. यावेळी पोलीस स्टेशन बाहेर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.(Bharatiya Janata Party’s Leader pravin darekar in bank fraud case)

मुंबई बँकेच्या निवडणुकीत दरेकर (pravin darekar) यांना बोगस मजूर म्हणून अपात्र ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर आम आदम पक्षातर्फे धनंजय शिंदे यांनी प्रवीण दरेकर यांच्या विरोधात दिली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी दरेकरांना आज चौकशीला बोलावलं. दरम्यान चौकशीत पोलिसांना सर्व सहकार्य करणार असल्याचे प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी स्पष्ट केलं आहे.

राज्य सरकारच्या दबावाखाली पोलिसांनी एफ.आय.आर दाखल केला प्रवीण दरेकरांचा आरोप

माझ्यावर एफआयआर दाखल करण्याची पोलिसांना खूप घाई झाली होती. त्यांच्यावर राज्य सरकारचा दबाव होता. मुख्यमंत्र्यांचा देखील या कारावाईसाठी अट्टाहास होता. राज्य सरकारच्या दबावाखाली एफआयआर दाखल झाला असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी केला आहे. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या चौकशीला पूर्ण सहकार्य करणार आहे. त्यांना पूर्ण माहिती देणार असल्याचेही प्रवीण दरेकर यांनी सांगितले. (Bharatiya Janata Party’s Leader pravin darekar in bank fraud case)

काय आहे हे बँक निवडणुकेचे प्रकरण ?

मुंबई बँकेच्या निवडणुकीत दरेकर (pravin darekar) यांनी मजूर या प्रवर्गातून निवडणूक लढवली होती. ते बिनविरोध निवडून आले होते. मात्र, मुंबई सहनिबंधकांनी दरेकर यांना प्रतिज्ञा मजूर सहकारी संस्थेचे सदस्य म्हणून अपात्र ठरवले होते. १९९७ पासून मजूर असलेल्या दरेकर (pravin darekar) यांनी आतापर्यंत बोगस मजूर म्हणून शासनाची फसवणूक केली आहे. त्यामुळं त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी माता रमाबाई मार्ग आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

हे सुध्दा वाचा : 

Mumbai Police summon BJP Oppn Leader Pravin Darekar in bank fraud case

नियमबाह्य पद्धतीने विक्री केलेल्या साखर कारखान्यांची चौकशी करा अन्यथा…. : प्रवीण दरेकरांचा इशारा

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी