मुंबईराजकीय

छत्रपती संभाजी राजे यांचा अवमान करणं योग्य नाही : प्रविण दरेकर

छत्रपती संभाजी राजे यांनी राज्यसभेची निवडणूक लढणार नसल्याची मोठी घोषणा केली आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं आहे. त्याच्या या निर्णयावरून आघाडी सरकारवर टिका केली जात आहेत.

टीम लय भारी 

मुंबई : छत्रपती संभाजी राजे (Pravin Darekar) यांनी राज्यसभेची निवडणूक लढणार नसल्याची मोठी घोषणा केली आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं आहे. त्याच्या या निर्णयावरून आघाडी सरकारवर टिका केली जात आहेत. या प्रकरणावर विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी हा छत्रपती संभाजी राजे यांचा अवमान आहे. अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. (Pravin Darekar said It is not right to insult Sambhaji Raje)

छत्रपती संभाजी राजे यांचा अवमान करणं योग्य नाही : प्रविण दरेकर

छत्रपती संभाजी राजे यांचा अवमान करणे हे कुठल्याही सत्तेला किंवा पक्षाला शोभणारे नाही. ज्यापद्धतीने छत्रपतींचा अवमान झाला हे निश्चितच महाराष्ट्राला शोभा देणारे नाही. त्यांना अशाप्रकारे अटी, शर्ती, चौकटीत बांधणे योग्य नव्हते अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी दिली आहे.

माध्यमांशी बोलताना दरेकर यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या हितासाठी, स्वराज्यासाठी जे पुढे येतील ते महाराष्ट्रातील जनतेसाठी निश्चितच स्वागतार्ह असेल. आज देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून सुराज्य आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न होत आहे. सर्व स्तरावर देश विकासाकडे नेण्याचा प्रयत्न होत आहे. तशाच पद्धतीने महाराष्ट्रात जर स्वराज्याची कल्पना पुढे नेण्यात राजेंचा हातभार लागत असेल तर हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती यांचा वारसा असणा-या राजेंचे स्वागत असेल असेही दरेकर (Pravin Darekar) यांनी स्पष्ट केले.

छत्रपती संभाजी राजे यांचा अवमान करणं योग्य नाही : प्रविण दरेकर

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे सतत मी शब्द पाळणारा मुख्यमंत्री, मी बाळासाहेबांना शब्द दिलाय म्हणून मुख्यमंत्री झालोय असे सांगत असतात असे स्पष्ट करतानाच दरेकर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी शब्द देऊनही शेतकऱ्यांच्या बांधावर काय झाले हे महाराष्ट्राने पाहिले आहे. जर छत्रपतींचे नाव घेऊन महाराष्ट्रात राज्यकारभार करत असाल तर छत्रपती संभाजी राजेंनीच अस सांगणं की, उद्धव ठाकरे यांनी मला दिलेला शब्द पाळला नाही, यावरुन उद्धव ठाकरे यांचे वचन फसवे असते हे राजेंच्या भूमिकेच्यासंदर्भात महाराष्ट्रातील जनतेला स्पष्टपणे दिसून (Pravin Darekar) आल्याची टिकाही त्यांनी केली.

हे सुद्धा वाचा :- 

Shivaji’s Descendant Sambhaji Chhatrapati Pulls Out Of Rajya Sabha Race

मोठी बातमी : अधिकाऱ्यांच्या बदल्या महिनाभर लांबणीवर

येत्या मान्सूनच्या पाश्वभूमीवर मध्य रेल्कनडून रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या नवा उपक्रम

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close