28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमुंबईवांद्रे येथील शासकीय भूखंडाचा कोट्यवधीचा घोटाळ्या संदर्भात प्रविण दरेकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

वांद्रे येथील शासकीय भूखंडाचा कोट्यवधीचा घोटाळ्या संदर्भात प्रविण दरेकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

टीम लय भारी 

मुंबई : मुंबईतील वांद्रे येथील बँड स्टॅण्डजवळील भूखंड विक्रीच्या व्यवहाराची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. याबाबत दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. गुरुवारी भाजप नेते आशिष शेलार यांनी या भूखंड विक्रीवरून सरकारला लक्ष्य करत (Pravin Darekar) चौकशीची मागणी केली आहे. (Pravin Darekar Sent letter to CM regarding scam)

विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे, सदर पत्रानुसार सदर भूखंड सन १९०५ मध्ये धर्मादाय संस्थेला नरसिंग होम बांधण्यासाठी भाडेपट्यावर देण्यात आला होता. तथापि, एवढ्या वर्षात या संस्थेने या जागेचा वापर केलाच नाही. सन 1980 साली जागेचा भाडेपट्टा कालावधी संपला. मुंबई विकास आराखडा-२०३४ नुसार या भूखंडावर असे आरक्षण दाखवण्यात आले आहे.

सदर ट्रस्टचा भाडेपट्टा करार कालावधी संपल्यानंतर ही जागा सरकारजमा करून घेण्याची वा ज्या कारणासाठी विकास आराखड्यात आरक्षण आहे, त्यासाठीच वापर करण्याच्या अटीवर धर्मादाय संस्थेने मागणी केल्यास भाडेपट्ट्याची मुदत वाढवून देण्याची कार्यवाही नियमानुसार अपेक्षित होती. तथापि, कायद्याला अपेक्षित कार्यवाही करण्याऐवजी नियमबाह्यपणे सन २०२० मध्ये सदर भूखंड विकण्याची जाहीरात सदर धर्मादाय संस्थेने दिली असून शासनाकडूनही भूखंड विकण्याबाबतच्या परवानग्या देण्यात आल्याचे समजते असा आरोपही दरेकर (Pravin Darekar) यांनी केला आहे.

सदर भूखंड विक्रीचे हे प्रकरण अतिशय गंभीर स्वरूपाचे असून खाजगी विकासकाला आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी अनेक अनियमितता, बेकायदेशीर कामे करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. हा एक मोठा आर्थिक घोटाळा असल्यामुळे व यात शासकीय महसुलाचे प्रचंड नुकसान होत असल्यामुळे आपण स्वतः या प्रकरणाची दखल घेऊन तातडीने या शासकीय भूखंड विक्री व्यवहाराला स्थगिती द्यावी, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करावी, हा शासकीय भूखंड सरकारजमा करण्याबाबतची कार्यवाही तातडीने करण्याचे आदेश जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा याना द्यावेत, अशी मागणीही दरेकर (Pravin Darekar) यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.

हे सुध्दा वाचा :-

Hanuman Chalisa row: Fadnavis slams Sena for ‘taking law into its own hand’

राणा दांम्पत्याच्या प्रकरणावरून न्यायालयाचे निरीक्षण म्हणजे ठाकरे सरकारला मिळालेली चपराक – प्रविण दरेकर

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी