30 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रजूनच्या अखेरीस मुंबईत पावसाची हजेरी

जूनच्या अखेरीस मुंबईत पावसाची हजेरी

टीम लय भारी

मुंबई : जून महिन्याच्या शेवटच्या दिवशी मुंबईत पावसाने हजेरी लावली आहे. गुरुवारी सकाळपासूनच पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे उन्हाचे चटके सहन करणारे मुंबईकर आता गारवा अनुभवत आहेत. यंदा हवामान खात्याकडून वर्तविण्यात येत असलेले सर्व अंदाज चुकत आहेत. महाराष्ट्रात १५ जून रोजी पावसाचे आगमन होईल, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले होते. परंतु हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या तारखेला पावसाने हजेरी न लावल्याने लोकांसोबतच शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला.

मुंबईत जून महिन्याच्या शेवटच्या दिवशीच पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच मुंबईच्या अंधेरी, दादर, प्रभादेवी आणि वरळी, तसेच मुंबईच्या इतर उपनगरांत पावसाला सुरुवात झाली. सकाळीच पावसाची रिपरिप सुरु झाल्याने कामाला निघालेल्या मुंबईकरांची तारांबळ उडाली. पण उन्हाच्या चटक्यांपासून सुटका झाल्याने मुंबईकरांनी या पावसाचा आनंद घेतला.

विदर्भातही पावसाचे आगमन
मुंबईसोबतच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात सकाळापासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. गेल्या काही दिवसांपासून डॅडी मारलेल्या पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे.

हे सुद्धा वाचा :

देशाच्या हवामानात मोठा बिघाड

भुस्खलनात 60 हून अधिक जवानांचा मृत्यू

ट्विटरवर समस्या मांडली, अन् ती उद्धव ठाकरे यांनी ऐकून घेतली

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी