33 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्याची पाणीबाणी टळली

पुण्याची पाणीबाणी टळली

टीम लय भारी

पुणेः पुणे जिल्हयात संततधार पावसाला सुरु आहे. त्यामुळे पुणेकरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुण्याला पाणी पुरवठा करणारी चारही धरणं आता तुडुंब भरण्याच्या स्थितीत आहेत. खडकवाला धरण 100 टक्के भरले आहे. मागच्या आठवडयात पुण्यात पाणी कपात जाहिर केली होती. आता मात्र पुणेकरांचे पाणी कपातीचे संकट टळले आहे.

चार दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, टेंमघर, वरसगाव या चारही धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. चारही धरणं मिळून 11 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पुणे करांची चिंता मिटली आहे. खडकवासला धरण 100 टक्के भरले आहे. 3 हजार 433 क्युसेक्स वेगाने मुळा नदीत विसर्ग सुरु आहे.

जूलैच्या पहिल्या आठवडयात पेरणी योग्य पाऊस झाला. त्यामुळे पुणे जिल्हयात 30 टक्के पेरणी झाली आहे. सुमारे 46 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. धरण क्षेत्रात मुबलक प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे लकवरच चारही धरणं शंभर टक्के भरतील.

हे सुध्दा वाचा:

भूगर्भातून येतो गडगडण्याचा आवाज

हवामान खात्याचा अंदाज सरस, ‘या’ ठिकाणी होणार ढगफुटी; वाचा सविस्तर…

दहशतवादांच्या निशाण्यावर RSS कार्यालय?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी