28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीयभांडण महाविकास आघाडी आणि भाजपचे; पण नासाडी टरबुजांची

भांडण महाविकास आघाडी आणि भाजपचे; पण नासाडी टरबुजांची

टीम लय भारी

मुंबई : भाजप वि. महाविकास आघाडी हा वाद सध्या विकोपाला पेटलेला आहे. विधान भवनाच्या आत मंत्री जरी एकमेकांच्या हातावर टाळी देताना दिसून येत असले तरी, भाजप आणि मविआमधील कार्यकर्ते ‘३६ चा आकडा’ असे नाते जपून आहेत. याचमुळे की काय, विधान भवनाच्या परिसरात मविआच्या कार्यकर्त्यांनी टरबूज आणून भाजपच्या कार्यकर्त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

नाथाभाऊ हे इतर मागासवर्गीयांचे नेते आहेत. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर नाथाभाऊंनी भाजप तळागाळात रूजवला. पण त्यांना फार त्रास दिला गेला. देवेंद्र फडणवीस यांनी नाथाभाऊंच्या विरोधात कारस्थाने केली. गेल्या अनेक वर्षांपासून नाथाभाऊंना त्रास दिला. कुणाचा नावाने टरबुज फोडला हे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे, अशा भावना व्यक्त करीत एकनाथ खडसेंच्या समर्थकांनी विधानसभा परिसरात जोरदार घोषणाबाजी केली. मी टरबूज फोडल आहे. आणखी टरबूज फोडणार आहे. मुक्ताईनगरला गेल्यानंतरही टरबूज फोडणार आहे, अशी भावना एका कार्यकर्त्याने प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केली.

विधान भवनाच्या परिसरात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. निकाल हाती लागण्याआधीच सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपला उमेदवार विजयी झाला असे घोषित करून टाकले. त्यामुळे याठिकाणी नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांमध्येच अधिक आत्मविश्वास पाहायला मिळाला.

विजयाच्या अगोदरच फलक
मतमोजणी पूर्ण होण्याअगोदरच यावेळी एकनाथ खडसे यांच्या विजयाचे अभिनंदन करणारे फलक लावण्यात आले होते. नाथाभाऊंचा विजय निश्चित असल्याने आम्ही हे फलक लावले असल्याचे कार्यकर्त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

हे सुद्धा वाचा :

रवी राणांचे तुणतुणे सुरूच, ‘हाती कथलाचा वाळा, अन् मला सोनूबाई म्हणा’

VidhanParishad Eection 2022 : राष्ट्रवादीच्या आमदाराने स्वतःच्याच सरकारला खिंडीत गाठले

VidhanParishad Election 2022 : ‘महाविकास आघाडी सरकार’ अचंबित निर्णय घेते, म्हणून आमचा उमेदवार निवडून येणार’

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी