33 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडात मृद व जलसंधारण विभागाची चार उपविभागीय कार्यालय तर अलिबाग येथे मुख्यालय...

रायगडात मृद व जलसंधारण विभागाची चार उपविभागीय कार्यालय तर अलिबाग येथे मुख्यालय सुरु होणार

टीम लय भारी 

अलिबाग : मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा जलसंधारण अधिकारी व उपविभागीय जलसंधारण अधिकारी कार्यालये नव्याने कार्यान्वित करणे व सर्व उपविभागीय कार्यालयांचे तालुका कार्यक्षेत्र घोषित करणेबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. (Raigad Soil and Water Conservation Department will be started)
यामध्ये रायगड (Raigad)  जिल्ह्यातील अलिबाग येथे जिल्हा मुख्यालय कार्यान्वित करण्यात आले असून या अंतर्गत रायगड जिल्ह्यातील उपविभागीय क्षेत्रातील माणगाव, कर्जत, कोलाड, अलिबाग या चार जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभागाची निर्मिती करण्याचा निर्णय शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाने घेतला आहे. याबाबत रायगड पालकमंत्री आदिती तटकरे यांनी मृद व जलसंधारण मंत्री यांच्याकडे मागणी करीत पाठपुरावा केला होता.
विभागाच्या राज्यस्तर यंत्रणेकडील कामकाजाची व्यापकता व यंत्रणेवरील कामाचा ताण कमी करण्याच्या उद्देशाने राज्यस्तर यंत्रणेकडील जिल्हा कार्यालये आणि उपविभागीय कार्यालये यांची संख्या काही प्रमाणात वाढ केल्यास राज्यस्तर यंत्रणा व जिल्हा परिषद यंत्रणा यांचा समतोल साधला जाऊन मनुष्यबळाचा योग्य वापर होण्यास मदत होणार आहे. या नवीन रचनेमुळे जलसंधारण विभागाचे रायगड जिल्ह्यातील कामकाज गतिमान होणार आहे.
रायगडात मृद व जलसंधारण विभागाची चार उपविभागीय कार्यालय तर अलिबाग येथे मुख्यालय सुरु होणार

हे सुद्धा वाचा : 

संत साहित्य संमेलन उद्यापासून रायगडमध्ये

छत्रपती संभाजीराजे भोसले रायगडावरील ‘मदार मोर्चा’वरुन संतापले; म्हणाले…

रायगड : एकाच शाळेतील १७ जण करोना पॉझिटिव्ह

विद्यापीठातल्या शिवाजी महाराज पुतळ्याच्या पायाभरणीत रायगडाची माती अन् चवदार तळ्याचे पाणी!

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी