32 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात पावसाचा कहर, बळीराजा चिंताक्रांत

राज्यात पावसाचा कहर, बळीराजा चिंताक्रांत

टीम लय भारी

मुंबई: आषाढी एकादशीला राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. चार दिवस बरसलेल्या पावसामुळे जनजीवन कोलमडून गेले आहे. अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत. अनेक ठिकाणी विजेचे खांब देखील उन्मळून पडले आहेत. त्यामुळे अनेक गावांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. पावसामुळे दळणवळण खंडीत झाले आहे.

मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे सातारा, सांगली, कोल्हापूर, परभणी, उस्मानाबाद, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, जळगाव जिल्हयांना पावसाने झोडपून काढले आहे. अनेक जिल्हयात शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.राज्यातील नदया, ओढे दुथडी भरुन वाहत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी पुलांवरुन पाणी वाहत आहे. शेतांमध्ये पाणी साचल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पुन्हा पेरणी करावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजा चिंताक्रांत झाला आहे. सततच्या पावसामुळे साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे.

रायगड, रत्नागिरी, नंदूबार, गडचिरोली, कोल्हापूरच्या अनेक भागात भात शेती पाण्यात गेली आहे. सांगली, सातारा, नाशिकमध्ये द्राक्षांचे मळे पाण्यात गेले आहे. अनेक ठिकाणी बाजरी, सोयाबिन पाण्यात गेल्यामुळे कुजून गेले आहे. परभणी जिंतूरमध्ये कापसाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. तीन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता. शासनाने दुबार पेरणीसाठी विनामूल्य बियाणे उपलब्ध करुन देण्याबरोबरच आर्थिक मदत करावी अशी मागणी केली जात आहे.

हे सुध्दा वाचा:

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी