33 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeमुंबईयेत्या मान्सूनच्या पाश्वभूमीवर मध्य रेल्कनडून रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या नवा उपक्रम

येत्या मान्सूनच्या पाश्वभूमीवर मध्य रेल्कनडून रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या नवा उपक्रम

टीम लय भारी

मुंबई : मध्य रेल्वेच्या पर्यावरण आणि हाऊस – कीपिंग व्यवस्थापन विभागाने विविध उपाययोजनांद्वारे (Rainwater Harvesting Initiatives)  पर्यावरणीय दक्षता साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. जलसंधारण, नवीकरणीय ऊर्जा, कचरा व्यवस्थापन, वनीकरणाद्वारे ग्रीन पॅच विकसित करणे इत्यादी संदर्भात माननीय राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण आणि रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या नियमांनुसार हे उपाय केले जातात. (Rainwater Harvesting Initiatives from Central Railway)

जलसंवर्धनाला चालना देण्यासाठी, मध्य रेल्वे विविध ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग पुरवत आहे. जलद शहरीकरणामुळे जमिनीत पावसाचे पाणी झपाट्याने कमी होत आहे, त्याचप्रमाणे देशाच्या बहुतांश भागात  (Rainwater Harvesting Initiatives) खोदलेल्या कूपनलिकाही पाण्याचे प्रमाण कमी करत आहेत. ज्या भागात पाऊस कमी पडतो तेथे ही समस्या आणखीनच वाढत जाते.

या समस्येवर मात करण्यासाठी मध्य रेल्वेने रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्ये (Rainwater Harvesting Initiatives) पुढाकार घेतला आहे आणि २०२१ मध्ये प्रदान केलेल्या २४ रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिट्ससह त्याच्या कार्यक्षेत्रातील स्थानके, कार्यशाळा, वसाहती इत्यादी विविध ठिकाणी १५८ रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिट्स प्रदान केले आहेत. यापैकी बहुतेक रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिट्स भुसावळ आणि सोलापूर विभागातील अवर्षण प्रवण भागात प्रदान केले आहेत जेथे पाऊस कमी पडतो.

या १५८ रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिट्सपैकी भुसावळ विभागात ७३ युनिट्स आणि त्यानंतर सोलापूर विभागात ५२ रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिट्स (Rainwater Harvesting Initiatives) आहेत. नागपूर विभागात १९ रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिट्स, पुणे विभागात ८ रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिट्स आणि मुंबई विभागात ६ रेन वॉटर हार्वेस्टिंग युनिट्स याशिवाय, मध्य रेल्वेने मुंबई विभागात रेन वॉटर हार्वेस्टिंगसह ६ सौर संयत्रे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोणावळा येथे प्रत्येकी 2, इगतपुरी आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे प्रत्येकी एक सौर संयत्र उपलब्ध करून दिले आहेत.

हे सुद्धा वाचा :- 

Central Railway’s Vistadome coaches receive overwhelming response

‘एनसीबीच्या माध्यमातून महाराष्ट्र म्हणजे ड्रग्जचे राज्य असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला’

आम्हा बहुजनांचा इतिहास पुसण्याची ताकद कुणाच्याही मनगटात नाही :  गोपीचंद पडळकर

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी